नाशिकचे समाजसेवक अक्षय गांधी यांना ‘आयडियल इंडियन अवार्ड-२०२२’ पुरस्कार; नाशिकच्या कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई हिरे यांनी केले अभिनंदन!
नाशिकचे समाजसेवक अक्षय गांधी यांना ‘आयडियल इंडियन अवार्ड-२०२२’ पुरस्कार; नाशिकच्या कार्यसम्राट आमदार सौ सीमाताई हिरे यांनी केले अभिनंदन!
नाशिक (दि. 25) विशेष प्रतिनिधी : नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते अक्षय गांधी यांना नुकतेच द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ‘आयडियल इंडियन अवॉर्ड्स-२०२२’ ने सन्मानित करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अक्षय गांधीचे सामाजिक कार्य पाहून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम विभागाच्या आमदार सौ. सीमाताई हिरे यांनी अक्षय गांधी यांना सन्मानपत्र व अक्षयला मिळालेले सुवर्णपदक देऊन गौरविले.
अक्षय गांधीने लहान वयातच सामाजिक कार्याला सुरुवात करून स्वत:ची नवी ओळख निर्माण केली आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर अक्षय गांधी यांनी भविष्यात अधिक प्रेरणा घेऊन सामाजिक कार्य करण्याचा संकल्प केला आहे, असे अक्षय गांधी यांनी यावेळी ‘नाशिक जनमत’ च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
- या यशाबद्दल अक्षय गांधी यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.