राऊ हॅाटेल ते जकातनाका रस्ता त्वरित करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेल चे शहराध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांनी दिला
राऊ हॅाटेल ते जकातनाका रस्ता त्वरित करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओ.बी.सी.सेल चे शहराध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांनी दिला
पंचवटी विभाग हा गेल्या अनेक दिवसांपासून विविध समस्यांचा आगार बनलेला असुन पावसामुळे पेठरोडची चाळण झालेली आहे.सदरील रस्त्याने पायी चालणे देखील दुरापस्त झाले असुन अनेक आंदोलने करुन देखील म.न.पा.प्रशासणाचे लक्ष नसून केवळ वेळ काढुपणा करत आहे.सदरील रस्ता त्वरित दुरुस्त करावा.
नाशिक करांची अवस्था धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झालेली असुन मानकरमळा,स्वामी विवेकानंद नगर,महाडा कॅालनी,महादेव बाग,रॅायला टाऊन पंढरिनगर,पिंगळे मळा आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई भासत असुन सदर परिसरात केवळ १ तास अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे.यात त्वरित सुधारणा करावी.
ड्रिमकॅस्टल सिग्नल ते चोपडा लॅान्स रस्ता मोठा रहदारीचा असुन सदरील रस्त्यावर अपघातांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने हनुमानवाडी व मोरेमळा चौफुलीवर गतिरोधके टाकण्यात यावीत.
चौधरीमळा,प्रोफेसर कॅालनी,मोरे मळा क्रुष्णनगर ,पांडुरंग नगर, पवारमळा,महाडा कॅालनी,मानकरमळा, आदी भागातील रस्ते मंजूर असुन त्वरित काम सुरु करण्यात यावे.उदय कॅालनी तसेच पाण्याची टाकी शांतिनगर येथे नव्याने ड्रेनेज लाइन टाकण्यात यावी.आदी मागण्यांचे निवेदन पंचवटी विभागीय अधिक्षक श्री. मंगेश वाघ यांना देण्यात आले असुन सदरील मागण्यांचा त्वरित विचार न झाल्यास मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी शहराध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड,माणिक आहेर,बन्सिलाल भागवत,एस. के.आहेर,एस.एस.महाले,रामभाऊ जाधव,दिनेश शिंपे,शशिकांत पाटील,भिष्माचार्य काशीद,गणेश वाघमारे,सचिन चव्हाण,आनंद पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.