जायखेडा येथील जवान सारग अशोक अहिरे यांचा आसाम मध्ये मृत्यू.
नाशिक जनमत. जायखेडा येथील रहिवासी व सध्या भारतीय सैन्य दलात असलेले जवान सारंग अशोक अहिरे यांच्या आसाम येथील डी जान येथे ड्युटीवर असताना मृत्यू झाला. मृत्यूचे कारण शव उच्चदनानंतर स्पष्ट होऊ शकेल अशी अशी माहिती जिल्हा प्रशासन दिली आहे.
शेतकरी कुटुंबातील सारग प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत वयाच्या 19 व्या वर्षी सैन्य दलात भरती झाला होता. तीन महिन्यापूर्वी ते घरी येऊन गेले होते. तसेच येत्या पाच जानेवारीला सुट्टीवर येणार होते. 11 वर्षापासून ते सैन्य दलात होते सारंग यांच्या मृत्यूची बातमी जायखेडा येथे येतात गावातील नागरिक व नातेवाईक यांची त्यांच्या घरी दिवसभर ये जा लागली होती. सारंग यांचा पार्थिव बुधवारी 28 तारखेला जायखेडा येथे पोहोचण्याचा अंदाज असून त्यानंतर शासकीय इत्मामत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .सारंग यांच्या पश्चात आई-वडील भाऊ भाऊजीयी.असा परिवार आहे या घटनेने जायखेडा व परिसरावर शोकळा पसरली आहे.