सो अंजुमताई कांदे यांनी उपस्थित राहून केली संत श्री सेवालाल महाराज जयंती उत्सवात साजरी.
सौ.अंजुमताई कांदे यांनी उपस्थित राहून संत श्री सेवालाल महाराज जयंती उत्सवात साजरी
अरुण हिंगमीरे
जातेगाव, नांदगाव
जातेगाव येथील वसंतनगर तांडा तसेच ढेकू तांड्यावर मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. ढेकू सेवागड तांडा येथील आई जगदंबा माता व संत सेवालाल महाराज मंदिर प्राणांगणात आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्सव प्रसंगी त्या उपस्थित होत्या.
याप्रसंगी बोलताना सौ.अंजुमताईंनी बंजारा समाजातील मुलींना शिक्षणात प्रेरणा मिळावी म्हणून इयत्ता बारावी च्या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या मुलींना भविष्यातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार असल्याचे जाहीर केले. बंजारा समाजाप्रती नेहमीच आमदार कांदे कुटुंबीयांना प्रेम आहे आणि यापुढेही, तसेच असेल, आश्वासित केले व आपल्या मुलींना जास्तीत जास्त शिक्षण द्या असेही आवाहन त्यांनी केले.
बंजारा समाजातील तरुण मोठ्या संख्येने भारतीय सेनेत सेवा देत असून त्यातील काही कार्यरत सैनिक या ठिकाणी उपस्थित होते, या सर्वांचे ताईंच्या हस्ते स्वागत सन्मान करण्यात आला.कुमारी गायत्री सुनील चव्हाण या विद्यार्थिनीने उत्कृष्ट भाषण केले, ताईंनी तिचा सत्कार करत तिला प्रोत्साहन पर ५०१ रुपयांचे बक्षीस या वेळी दिले.याप्रसंगी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विभागीय अधिकारी एन के राठोड यांनी संत श्री सेवालाल महाराज यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख विद्याताई जगताप मनमाड शहर प्रमुख संगीताताई बागुल नांदगाव शहरप्रमुख रोहिणीताई मोरे, वरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रकाश चव्हाण, कांतीलाल चव्हाण, खूपचंद चव्हाण, जातेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक पतीन चव्हाण, गोरख चव्हाण, यांनी परिश्रम घेतले. ढेकू ग्रामपंचायत सरपंच, उप सरपंच सदस्य आदींसह नागरिक आणि बंजारा समाज बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांतीलाल राठोड यांनी केले तर मान्यवरांचे आभार जातेगांवचे माजी उपसरपंच भाऊसाहेब चव्हाण यांनी केले.