सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन;* *शासकीय कार्यालयांचे योगदान मोलाचे* *:अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे*
*सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन;*
*शासकीय कार्यालयांचे योगदान मोलाचे*
*:अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे*
*सशस्त्र सेना ध्वजदिन 2022 निधी संकलनाचा आज झाला शुभारंभ*
*नाशिक, दिनांक 7 डिसेंबर, 2022:नाशिक जनमत * दरवर्षी 7 डिसेंबर हा दिवस ध्वजदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासूनच लष्काराच्या तिन्ही दलाचे प्रतीक असलेला ध्वज प्रदान करून त्या निमित्ताने ध्वजदिन निधी संकलनाला सुरूवात होते. आज 2021 मध्ये 297 टक्के उद्दिष्टपूर्ती पाहता सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात शासकीय कार्यालयांचे योगदान मोलाचे आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी केले आहे.
आज नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे सशस्त्र सेना ध्वजदिन 2022 शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे बोलत होते. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. राजेंद्र गाडेकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (निवृत्त लेफ्टनंट कमांडर) ओंकार कापले, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अविनाश रसाळ, कल्याण संघटक मार्तंड दाभाडे यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे पुढे म्हणाले की, ध्वजदिन संकलन निधीतून आजी माजी सैनिक, वीरपत्नी व त्यांच्या अवलंबितांसाठी विविध प्रकराच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. भरीव योगदानातूनच या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यास नक्कीच मदत होणार आहे. जिल्हा प्रशासन माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी व अवलंबित कुटुंबांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर आहे. सर्व शासकीय कार्यालयांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2022 साठी भरीव योगदान द्यावे, असे आवाहनही अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन, अमर जवान ज्योतीला पुष्पचक्र अपर्ण करून व शहिदांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. यानंतर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ओंकार कापले यांनी प्रास्ताविकात ध्वजदिन निधी -2021 चे देण्यात आलेले ध्वजदिन उद्दिष्ट रूपये 1 कोटी 38 लाख 48 हजार च्या आजमितीस 4 कोटी 12 लाख 50 हजार असे एकूण 297% संकलन झाले असल्याची माहिती यावेळी दिली. संकलित झालेल्या निधीचा विनियोग व माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना कशा राबविण्यात येतात याची माहिती दिली.
या निधी संकलनात जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांनी तसेच स्थानिक नागरिकांनी ध्वजदिन निधी संकलनात भरीव योगदान देणाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
*माजी सैनिकांच्या पाल्यांचा करण्यात आला सत्कार:*
*इयत्ता 10 वी 12 वी शालांत परिक्षेत यशासाठी रू. 10 हजार धनादेश देवून विशेष गौरव*
1. कु. श्रुतिका नंदू पाटील, इयत्ता 10वी (96.40टक्के गुण)
2. कु. स्नेहा वसंत केदार, इयत्ता 10वी (95.60टक्के गुण)
3. कु. संचिता किसान शेटे, इयत्ता 10वी (95.40टक्के गुण)
4. कु. शरयु चिंतामण निकम, इयत्ता 10वी , सी. बी. एस. ई. बोर्ड (97.40टक्के गुण)
5. कु. प्रांजल विलास पाटील, इयत्ता 12 वी (95.60टक्के गुण)
6. कु. कोमल नवनाथ करडे, इयत्ता 12वी (92.33टक्के गुण)
*विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणारे माजी सैनिक व पाल्य यांचा रू.10 हजार धनादेश देवून विशेष गौरव*
1. माजी सैनिक सुवर्ण कुमार गंगाधरण, यशस्वी उद्योजक
2. कु. शिवानी मिलिंद जोशी, जबलपूर येथे अखिल भारतीय नृत्य प्रतियोगिता भरत नाट्यम
प्रथम,
3. कु. वजातअली नसरूद्दिन सय्यद, सिनिय नॅशनल नेटबॉल चॅम्पियनशिप राष्ट्रीय स्पर्धेत
तृतीय क्रमांक