22 डिसेंबर पासून खानदेश महोत्सव. शंकर महादेवन सह सिनेतारकांसोबत रंगणार महोत्सव.
“नाशिक जनमत प्रतिनिधी. गेल्या दोन वर्षाच्या करोनाच्या विश्रांतीनंतर निर्बंध मुक्त खानदेश म्हा उत्सव चे आयोजन 22 ते 25 डिसेंबर पर्यंत करण्यात आले आहे यावेळेस या महाउत्सवाचे आकर्षण म्हणजे प्रसिद्ध गायक शंकर महादेवन तसेच मराठी चित्रपटातील कलाकार मानसी नाईक. लावणी सम्रागणी सुवर्णा काळे भारत गणेशपुरे हेमांगी कवी योगेश शिरसाठ आदी या महोत्सवात सहभाग असणार आहे यासोबत 120 स्टॉल च्या माध्यमातून खानदेशी खाद्यपदार्थांची चव यावेळेस चाखता येणार आहे अशी माहिती आयोजक आमदार सीमा हिरे व रेशमी हिरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
महा उत्सवाच्या पहिल्या दिवशी 22 डिसेंबर रोजी महादिव्य स्वागत यात्रा निघेल त्यात आदिवासी नृत्य व खानदेशी बँड चा समावेश असणार आहे हे 20 रोजी क्रांती मळगावकर यांचा होम मिनिस्टर हा खास महिलांसाठी कार्यक्रम होणार असून 24 रोजी मराठी कलाकारांचा नृत्य संध्या हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात चला हवा येऊ द्या मधील कलाकारांचं मानसी नाईक व सुवर्ण काळे यांचा सहभाग असणार आहे तर या कार्यक्रमाच्या समारोपस शंकर महादेव न यांच्या आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे पत्रकार परिषदेमध्ये दूरदृश्य प्रणाली द्वारे संवाद साधला नाशिकचे अभिनेते किरण भालेराव व रश्मी हिरे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी सीमाताई हिरे आमदार यांनी आभार मानले
खानदेश महोत्सवामध्ये खासदार सीआर पाटील गुजरात . विशेष पुरस्कार विजय सूर्यवंशी उत्पादन शुल्क विभाग. शाहू खैरे शिक्षिका कुंदा बच्छाव उद्योजक बुधाजी पानसरे व्यावसायिक मनोज कोटकर क्रिकेटर सत्यजित बच्छाव बाळासाहेब घुगे संजय धोंडगे महाराज. रायमा रज्जाक शेख युनायटेड वूई स्टॅन्ड एनजीओ. गुलाबी थंडीमध्ये नाशिककरांना यावेळेस निर्बंध मुक्त खानदेश महोत्सवाचा आनंद घेता येणार आहे नागरिकांनी या महा उत्सवाचा आनंद घ्यावा असे आयोजक यांच्यातर्फे आवाहन करण्यात आले आहे.पत्रकारांनी शंकर महादेवन यांना यावेळेस आपण अहिराणी गाणे गाणार का असे विचारले असता त्यांनी हे काय असते असे ते बोलले. दरम्यान एखादे गाणे माझ्याकडे पाठवा मी शिकण्याचा प्रयत्न करतो असेही ते बोललेत. 22 ते 25 तारखेपर्यंत खानदेश महोत्सव सिटी सेंटर मॉल जवळील ठक्कर डोम येथे होणार आहे..