दूधवाढीसाठी आक्सिटोसीनचा वापर करणारे सहा गोठेमालक अटकेत..
दूधवाढीसाठी आक्सिटोसीनचा वापर करणारे सहा गोठेमालक अटकेत
पुणे । गाई व म्हशीचे दूध वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये इंजेक्शन व विविध औषध देण्याचे प्रमाण सध्या आणि गोठ्यांमध्ये वाढले आहे या औषधांमध्ये आपली पदार्थ असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे मनुष्याच्या आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो दरम्यान पुण्यामध्ये काही गोठा मालकांवर कारवाई करून अटक करण्यात आली आहे. या घटनेने गोठा मालकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.गाई, म्हशींचे दूध वाढवण्यासाठी ऑक्सिटोसीन औषधांचा वापर करणाऱ्या पुणे, पिंपरीतील सहा गोठे मालकांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. या औषधाचा वापर केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
विठ्ठल भिवाजी झिंजुर्डे (४८, झिंजुर्डे मळा, पिंपळे सौदागर), सागर कैलास सस्ते (३५, रा. सस्ते मळा, आळंदी
रस्ता, मोशी), विलास महादेव मुरकुटे (५७, रा. मारुंजी, ता. मुळशी, जि. पुणे), सुनील खंडप्पा मलकुनाईक (५१, रा. हरेकृष्णा पार्क, टिंगरेनगर, धानोरी रस्ता), गणेश शंकर पैलवान (५०, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी), महादू नामदेव परांडे (५१, रा. दिघी, आळंदी रस्ता) अशी अटक करण्यात आलेल्या गोठे मालकांची नावे आहेत.