बाळासाहेब सोनवणे यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव.
*बाळासाहेब सोनवणे यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव*
*नाशिक–*
*आज ‘रिपब्लिकन वार्ता’च्या वर्धापन दिनानिमित्त सिडकोमधील मायको हॉल, सिंहस्थनगर या ठिकाणी निफाड तालुक्यातील मांजरगाव येथील भूमिपुत्र, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी/ संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष,डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशनचे नाशिक जिल्हा समन्वयक,तसेच गंगापूर येथील दे.ना.पाटील माध्यमिक विद्यालय व ज्यु.कॉलेजचे उपशिक्षक बाळासाहेब दादा सोनवणे यांना शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल “राज्यस्तरीय समाज भूषण” पुरस्कार देत यावेळी सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले.*
*यावेळी सीटुचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व कामगार नेते डॉ. डी.एल. कराड, सहायक आयुक्त मयूर पाटील, वंचितचे अविनाश शिंदे,वायसीएम मुक्त विद्यापीठ पत्रकारिता अभ्यासकेंद्राचे समन्वयक प्रा.श्रीकांत सोनवणे,पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पगारे,रिपब्लिकन वार्ताचे संपादक अनिल आठवले,निवासी कार्यकारी संपादक प्रा. व्यंकटराव कांबळे आदी उपस्थित होते.*
*फोटो कॅप्शन-*
*नाशिक : रिपब्लिकन वार्ताच्या वर्धापनदिनानिमित्त “राज्यस्तरिय समाज भूषण” पुरस्कार गंगापूर येथील दे.ना. पाटील माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक व महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी/अधिकारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे यांना प्रदान करताना सीटुचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी.एल. कराड समवेत सहायक आयुक्त मयूर पाटील, वंचितचे अविनाश शिंदे, प्रा. श्रीकांत सोनवणे. शशिकांत पगारे.*