राज्यात 18 तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता. हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज.
नाशिक जनमत ऑगस्ट महिन्याच्या पंधरा तारखेनंतर राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने दांडी मारली होती त्यामुळे अनेक भागांमध्ये पिके ऊन धरत होती दरम्यान गणेश उत्सवाच्या पूर्वसंध्येला राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला त्यामुळे पिकांना नव संजीवनी मिळाली दरम्यान पुढे अठरा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील विविध राज्यात मुसळधार व चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडेल असे परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डंक यांनी अंदाज वर्तव्यला आहे. पंजाबरावांच्या मते, राज्यात 8, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होणार आहे. एवढेच नाही तर 18 सप्टेंबर पर्यंत कोसळणारा पाऊस हा विजांच्या कडकडाटासह कोसळणार आहे. या कालावधीत राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात सर्वाधिक पाऊस बघायला मिळणार आहे.
यामुळे शेतकरी बांधवांनी आपली तसेच आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी असे देखील आवाहन यावेळी हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी केले आहे. पंजाबराव यांच्या मते 18 सप्टेंबर पर्यंत राज्यात कोसळणारा पाऊस ओढे-नाले भरून वाहणारा असणार आहे.
मात्र 18 सप्टेंबर पर्यंत राज्यात पाऊस हा भाग बदलत पडणार आहे. अशा परिस्थितीत ज्या भागात पिके उन्हामुळे किंवा पावसाच्या अभावामुळे होरपळत आहेत अशा ठिकाणी पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. मात्र काही ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याने जास्तीच्या पावसाचा देखील शेतकरी बांधवांना फटका बसू शकतो. सध्या गणपती उत्सव चालू असून पावसामुळे देखावे बघण्यासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये वित्तय येत आहे. भाविकांची तारांबळ उडत आहे.