शासकीय वस्तीग्रह च्या भाडेतत्त्वावर इमारतीसाठी जागा मालकांना आव्हान.
दिनांक: 4 जून, 2022
*शासकीय वसहतिगृहाच्या भाडेतत्वावर इमारतसाठी जागा मालकांना आवाहन*
*नाशिक, दिनांक: 4 जून, 202*
नाशिक जनमत जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे सामाजिक न्याय विभागांतर्गत शंभर विद्यार्थी क्षमतेचे मुलींचे शासकीय वसहतिगृह सुरू करण्यात आले आहे. या वसतिगृहासाठी इमारत भाडेतत्वावर घेणे आवश्क असल्याने इच्छुक इमारत मालक किंवा संस्थेने येत्या सात दिवसाच्या कालावधीत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सुरू असलेल्या शासकीय वसहतिगृहात मागासवर्गीय मुलींना इयत्ता 8 वी ते पदवीपर्यंतच्या वर्गांना मोफत प्रवेश दिला जातो. सद्यास्थितीत ज्या इमारतीमध्ये मुलींचे शासकीय वसहतिगृह सुरू आहे, ती इमारत बदलविण्याचे प्रस्तावित आहे. त्याअनुषंगाने या तालुक्यातील इच्छुक इमारत मालकांनी किंवा संस्थांनी इमारत भाडेतत्वावर देण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, नाशिक या कार्यालयात इमारत भाडे तसेच संबंधित अटी व शर्तीनुसार परिपुर्ण प्रस्ताव या कार्यालयास सादर करावेत. असेही सहाय्यक आयुक्त श्री. वसावे यांनी कळविले आहे.
अटी व शर्तीव्यतिरिक्त इमारत भाडे तत्त्वावर घेण्याबाबतचे सर्व अधिकार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नाशिक राखुन ठेवण्यात आले आहेत असेही शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.
*अशा आहेत अटी व शर्ती*
▪️ वसतिगृह तात्काळ स्थलांतर करावयाचे असल्याने इमारत सद्यस्थिती रिकामी असणे आवश्यक आहे.
▪️मुलींच्या निवासासाठी व्यवस्था व सुरक्षितता या दृष्टीकोनातुन इमारतीची रचना असावी, अशा इमारतीस प्राधान्य देण्यात येईल.
▪️इमारतीचे बांधकाम क्षेत्रफळ अंदाजे १०,०००/- चौ.फु. असावे.
▪️ इमारत पुर्णत्वाचा दाखला नगरपरिषद/नगरपालिका/महानगरपालिका यांच्याकडील असावा.
▪️ इमारत बांधकाम परवानगी संबंधित प्राधिकरणाची घेण्यात आलेली असावी.
▪️ ७/१२ उतारा व खरेदीखत इमारत मालकाच्या नावाने असावे.
▪️इमारत विद्यार्थी निवासाच्या क्षेत्रफळाव्यतिरिक्त स्टोअर रुम, भोजन कक्ष, ग्रंथालय, संगणक कक्ष, कार्यकम हॉल, गृहप्रमुख निवास, व्यायाम शाळा, वसतिगृह कार्यालय इत्यादी सुविधा आवश्यक आहेत.
▪️ १०० विद्यार्थीनींच्या क्षमतेच्या प्रमाणात स्नानगृह, शौचालय सुविधा असावी.
▪️ वसतिगृह इमारतीस संरक्षक भिंत असणे आवश्यक आहे.
▪️ पुरेश्या प्रमाणात पाण्याची सोय, विद्युत व्यवस्था असावी.
▪️ इमारत ताबा घेतांना आवश्यक सोयी-सुविधा इमारत संपुर्ण रंगरंगोटी इमारत मालकाने करुन देणे बंधनकारक राहिल.
▪️ इमारतीच्या आजुबाजुचा परिसर हा विद्यार्थीनींना राहण्यासाठी सुरक्षित असलेबाबत संबधित विभागाने प्रमाणित केलेले असावे.
▪️ इमारतीचा परिसर राहण्यास आरोग्यदृष्टया योग्य असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचा दाखला आवश्यक आहे.
▪️ इमारत, इमारतीची जागा ही वादविवाद, प्रशासकिय कारवाई अथवा न्यायप्रविष्ठ बाब सुरु असलेली इमारत नसावी.