आमदार सुहास अण्णा कांदे यांची नांदगाव मतदारसंघात उस्फूर्त स्वागत.
*आमदार सुहास अण्णा कांदे यांचे नांदगाव मतदारसंघात उत्स्फूर्त स्वागत*
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक
गेल्या 15 ते 20 दिवसांच्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीनंतर नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे आज मतदार संघात परतले.
यावेळी मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी आमदारांचे स्वागत करण्यासाठी एकच गर्दी केली होती. प्रत्येक नागरिक हा आमदारांचे घेतलेल्या निर्णयाचे स्वागत व अभिनंदन करताना दिसून आला. याप्रसंगी मतदारसंघातील मोठे राजकीय नेते व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी झालेल्या अनेक भाषणांमध्ये प्रत्येकाने आमदार कांदे यांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाशी आम्ही ठामपणे पाठीमागे उभे असून भविष्यातील वाटचालीस आमदार कांदे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू असे मत व्यक्त केले.
गेल्या अडीच वर्षात आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मतदारसंघातील नागरिकांची मन जिंकली आहेत आणि कधी नव्हे तो असा जीवाला जीव देणारा आमदार मतदारसंघाला भेटला आहे. म्हणूनच आमदारांच्या निर्णयासोबत आम्ही आहोत आणि सदैव आमदारांसोबत राहू असे मत व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी आमदार सुहास अण्णा यांनी बोलताना सांगितले की, आजही पक्षप्रमुख उद्धव साहेबांबद्दल ठाकरे कुटुंबीयांबद्दल आम्हाला आदर आहे आम्ही शिवसेना सोडलेली नाही शिवसेना सोडणार नाही आणि आता आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब तर मुख्यमंत्री झालेले आहेत तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाने मतदार संघाचा विकास करत पुढील वाटचाल करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मतदार संघाला दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणे हे ध्येय ठेवून अधिक जोमाने कामाला लागणार असल्याचे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले.
बापूसाहेब कवडे,विष्णू निकम, आनंद कासलीवाल,सुभाष कुटे, राजाभाऊ जगताप,अमोल नावंदर, विलास आहेर, गुलाब भाबड, किरण देवरे, सुनील जाधव, पंकज निकम, अंकुश कातकडे, अनिल रिंढे, रफिक शेख, गोकुळ कोठारी, डॉ.सुनील तुसे, राजाभाऊ देशमुख, सुधीर देशमुख, बाळासाहेब आव्हाड, विजय इप्पर, राजेंद्र पवार, सरपंच अश्विनी पवार, दीपक सूर्यवंशी, नूतन कासलीवाल, सुनील कासलीवाल, संदीप सूर्यवंशी, प्रमोद चव्हाण, किशोर लहाने, राजेश शिंदे, शिवसैनिक, पदाधिकारी,महीला आघाडीच्या कार्यकर्त्या, मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.