ब्रेकिंग
नाशिक मधील अंबडच्या संजू नगर मध्ये टोळक्याने गळा चिरून केला खून.
नाशिक जनमत मंगळवारी रात्री अंबड परिसरातील संजू नगर भागामध्ये टोळक्याने एका युवकाच गळा चिरला यावेळेस नागरिकांनी या युवकास सिविल हॉस्पिटल येथे ऍडमिट केले गाळा कापल्या गेल्याने या युवकास बोलता येत नव्हते दरम्यान उपचार घेत असताना या युवकाचा मृत्यू झाला या घटनेने पुन्हा एकदा अंबड परिसर चर्चेत आला आहे मागील काही दिवसांपूर्वी अंबड एमआयडीसीमध्ये एका कारखानदाराचा खून झाला होता. दरम्यान गुन्हेगारी युवक मागचा पुढचा विचार करत खून करण्यापर्यंत पोहोचले आहेत अंबड पोलिसांनी रात्रंदिवसाठी गस्त वाढावी अशी मागणी नागरिक करत आहे घटनेचा तपास अंबड पोलीस करत आहे. अंबड परिसरामध्ये गुन्हेगारी वाढल्याने नागरिक दहशतीखाली आहे आत्महत्या खून असे प्रकार वाढले आहे दहा दिवसापूर्वी पतीने पत्नीचा चिंचोळे भागात खून केला होता ही घटना ताजी असताना पुन्हा खुणाच्या घटना घडत आहे.