ब्रेकिंग
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त पिक विमा सपत्ताचे आयोजन. शेतकऱ्यांना पिक विमा काढण्याचे आवाहन.
*स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पिक विमा सप्ताहाचे आयोजन; शेतकऱ्यांना पिक विमा काढण्याचे आवाहन*
*नाशिक: दिनांक 30 जून, 2022 (जिमाका वृत्तसेवा):*
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव-इंडिया @75 या मोहिमेंतर्गत राज्यात 1 ते 7 जुलै 2022 या कालावधीत पिक विमा सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेवून पिक विमा व फळपिक विमा काढावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद केल्यानुसार, शेतकऱ्यांना पिक विमा व फळपिक विमा याबाबत काही अडचण असल्यास विमा कंपनी, बँक, आपले सरकार केंद्र, कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी कळविले आहे.
0