सातपूरच्या अशोक नगर मध्ये रहिवासी क्षेत्रामध्ये बिबट्या. जेरबंद.
नाशिक जनमत नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोक नगर येथे बिबट्या रहिवासी क्षेत्रात आढळून आला जवळपास एकच जागेवर तीन तास बिबट्या ने नागरिकांना दर्शन दिले एका बंगल्याच्या आवारामध्ये बिबट्या बसलेला आढळून आला बंगल्याच्या शेजारी असणाऱ्या नागरिकांना दर्शन दिल्यावर ताबडतोब वन विभागाला कळविण्यात आले यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला पकडले यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती रवाशी क्षेत्रामध्ये बिबट्याचा वावर वाढला आहे. जंगल सोडून बिबटे रहिवासी क्षेत्राकडे का वळू लागले याचा अभ्यास वन
विभागाने करावा लागेल. याच बंगल्याच्या आजूबाजूला व परिसरामध्ये लहान लहान मुले दररोज खेळत असता आज जर का मुले खेळत असतील तर बिबट्याने मुलांवर हल्ला केला असता दरम्यान अशोक नगर भागातील रहिवाशांच्या स्त्रकते मुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. नाशिक शहराच्या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर वाढल्याचे दिसत आहे दरम्यान बिबट्या जर बंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नीश्वास सोडला.