दिलखुलास कार्यक्रमात पर्यावरण अभ्यासक राजेश पंडित यांची मुलाखत.
*दिलखुलास’ कार्यक्रमात पर्यावरण अभ्यासक राजेश पंडित यांची मुलाखत*
मुंबई, दि. 11: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात पर्यावरण अभ्यासक राजेश पंडित यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर गुरुवार दि. 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्यातील पंच्याहत्तर नद्या अमृत वाहिनी करण्याचा उपक्रम तसेच चला जाणूया नदीला उपक्रम सुरु आहे. या निमित्ताने पर्यावरण अभ्यासक राजेश पंडित यांनी नद्यांचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात दिलखुलास कार्यक्रमात विस्तृत माहिती दिली आहे. सर्वांनी नदी प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले आहे. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
00000