ब्रेकिंग

शेतकरी व पाणीवापर संस्थांनी पाणी लाभासाठी 28 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावे .सागर शिंदे.

18 नोव्हेंबर, 2022

*शेतकरी व पाणीवापर संस्थांनी पाणी लाभासाठी*
*28 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत*
*-सागर शिंदे*

*नाशिक: दिनांक 18 नोव्हेंबर, 2022 (:*नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, चांदवड, सिन्नर व दिंडोरी तालुक्यातील एकूण 34 लघु प्रकल्पातील बंधाऱ्यावरील उपलब्ध पाणीसाठ्यानुसार रब्बी हंगाम 2022-23 करिता पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार शेतकरी व पाणी वापर संस्थांनी पाण्याचा लाभ घेण्यासाठी 28 नोव्हेंबर 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत आपले अर्ज नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात सादर करावे, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांनी केले आहे.

शासनाच्या धोरणानुसार धरणातील उपलब्ध पाणी हे उन्हाळा हंगामाअखेर पुरवावे लागणार असल्याने प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागवून उर्वरित पाण्यात शेतीच्या पिकासाठी व औद्योगिक कारखाने यांना पुरवठा करण्याचे नियोजन आहे. वर नमूद धरणातील पाणी हे लाभक्षेत्रातील उभ्या पिकास हंगामी भुसार, फळबाग व बारामाहि उभ्या पिकांना रब्बी हंगामा अखेर पाणी पुरवठा सुलभ व्हावा यासाठी मंजूरी क्षेत्रात उभ्या पिकांना पाणी घेतांना शेतकऱ्यांनी काटकसरीने पाणी घ्यावे तथा सूक्ष्म सिंचनावर भर देण्यात यावा. पाणी पुरवठा यामुळे होणाऱ्या पीक नुकसानीची जबाबदारी ही व्यक्तीश: शेतकऱ्याची राहील. त्याबाबत शासनाकडून कोणतीही भरपाई देय नाही. ज्या कालव्यांवर अथवा चारीवर नमूना नंबर 7 ची प्रवर्गातील मागणी उपलब्धतेपेक्षा जास्त असल्यास त्या ठिकाणी मागणी क्षेत्रात शाखा, उपविभाग स्तरावर सम प्रमाणात कपात करून अटी व शर्तीनुसार मंजूरी देण्यात येणार आहे, असेही सागर शिंदे यांनी कळविले आहे.
0000000000

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे