ऊत’ चित्रपटाला एशिया फिल्म अॅवॉर्ड

‘ऊत’ चित्रपटाला एशिया फिल्म अॅवॉर्ड•
प्रतिनिधी |
नाशिक जन्मत
मराठी ऊत चित्रपटाला मलेशिया इंटरनॅशनल फिल्म महोत्सवात बेस्ट एशिया फिल्म अॅवॉर्ड म मिळाला आहे. भावना, प्रेम, संघर्ष याच्याही पुढे जाऊन खूप वैगळ्या पद्धतीने के मांडलेला वेरा क फिल्म्स निर्मित ‘ऊत’ हा मराठी मु चित्रपट राम मलिक यांनी दिग्दर्शित केला आहे. ठाणे जोशी बेडेकर कॉलेजचा माजी विद्यार्थी व सध्या नाशिक स्थित आदित्य येवले या चित्रपटात अभिनेत्याच्या मित्राच्या भूमिकेत आहे.
चित्रपटाने राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ही बाजी मारली आहे. पदार्पणात चित्रपटाचा निर्माते राज मिसाळ याने अनेक पुरस्कार मिळवले आहेत. अजय गोगावले, आदर्श शिंदे, हरिहरन यांनी गाणी गायली आहेत. आदित्य येवले याने आधीही प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. मराठी ऊत चित्रपटाला मिळालेल्या पुरस्कारबद्दल नाशिकस्थित अभिनेता आदित्य येवलेसह ‘ऊत’ टीमचे कौतुक होत आहे.