क्रिडा व मनोरंजन

जीवनाच्या मन शांती साठी परमेश्वराचे नाम स्मरण महत्वाचे.

  • *जीवनाच्या धन्यतेसाठी नामस्मरण महत्वाचे*

*हभप.मनिषाताई महाराज बिडाईत*

 

अरुण हिंगमीरे

जातेगाव नांदगाव

Σ

 

मनुष्य देह दुर्लभ असून या जीवनाच्या धन्यतेसाठी भगवंताचे नामस्मरण महत्वाचे असून अंतकरणाचा मळ घालवण्याचे काम नामस्मरण करते असे प्रतिपादन भागवताचार्य ह.भ.प मनिषाताई महाराज बिडाईत यांनी केले.

बोलठाण येथे सुरू असलेल्या वार्षिक अखंड हरिनाम सप्ताह मध्ये दिनांक 19 रोजी त्यांचे कीर्तन झाले. संत तुकाराम महाराज यांच्या “सांगतो तुम्हांसी भजा रे विठ्ठला” या अभंगावर विवेचन करताना त्यांनी नामस्मरणाचे महत्व विविध उदाहरणद्वारे विशद केले.

वारकरी संप्रदायात संत ज्ञानेश्वर महाराज हे आई तर संत तुकाराम महाराज हे बाप असून या माय -बापांनी दिलेली शिकवण आचरणात आणा, संत वाणी ही आधिकार वाणी असून संतांचे विचार ऐकणे व त्याचे आचरण करणे काळाची गरज आहे, भगवंताला ओळखल्यावर जीवनाची धन्यता असल्याचे मनीषाताई बिडाईत म्हणाल्या.छोटे छोटे कारणाने कलह झाला म्हणून जीवन संपवू नका, जीवन फार अनमोल आहे ते पटवून देताना त्यांनी विविध दाखले दिले. या सप्ताह साठी भगवान राव जाधव,पोपट कोल्हे,शिवदास पोफळे,प्रल्हाद रिंढे,शिवाजी नाना रिंढे,गंड सर, कैलास शिंदे, आदींसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.

*हरिनाम सप्ताहच्या मंडपात इफ्तार पार्टीचे नियोजन*

बोलठाण गावात सर्वधर्मसमभावाचे एक उत्तम उदाहरण बघायला मिळाले, जातीयतेला दूर सारत सध्या सुरू असलेल्या रमजान महिना निमित्ताने मुस्लिम बांधवासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, विशेष म्हणजे गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहच्या मंडप मध्ये हा उपक्रम राबविण्यात आला, यामुळे गावातील ऐक्याचे दर्शन घडले.

*नामवंत किर्तनकारांचे कीर्तन, हरीजागर*

बोलठाण गावात सुरू असलेल्या वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहचे हे ११ वे वर्ष असुन या सप्ताह मध्ये राज्यातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ एप्रिल पासून सुरू झालेल्या या सप्ताहाचा समारोप दिनांक २३ रोजी रामेश्वरानंदजी महाराज , वैसपूर यांच्या कालाच्या कीर्तनाने होईल .

या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे