नाशिक शहरातील नवीन गंगापूर रस्त्याचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला.

नाशिक शहरातील नवीन गंगापूर रस्त्याचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला. नाशिकचे उपमहापौर विलास अण्णा शिंदे यांनी ही समस्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवल्यावर या रस्त्याला अजून एक पर्याय रस्ता म्हणून कॅनल रोड मंजूर झाला असून त्याचे आज उद्घाटन झाले. नाशिकचे उपमहापौर विलास अण्णा शिंदे यांनी ही समस्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे बोलून दाखवल्यावर या रस्त्याला अजून एक पर्याय रस्ता म्हणून कॅनल रोड मंजूर झाला असून त्याचे आज उद्घाटन झाले

नासिक जनमत नाशिक शहरातील महत्वपूर्ण रस्ता गंगापूर रोड व या रस्त्यावरची मोठ्या प्रमाणात असलेली वाहतूक गर्दी यामुळे नेहमी या रस्त्यावर ट्राफिक जाम होत असते. तसेच नवशा गणपती देवस्थान सोमेश्वर गंगापूर धरण इत्यादी भागाकडे जाणारा महत्वपूर्ण रस्ता असल्याने नेहमी ट्रॉफी या भागात जाम असे.
रस्ते, पायाभूत सुविधा आणि शिक्षणाच्या माध्यमातून नाशिकच्या विकासाला नवी गती मिळत असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहराचा सर्वांगीण कायापालट होणार असल्याचे याप्रसंगी स्पष्ट केले.

गंगापूर रोडवरील नवीन रस्त्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. चांगले रस्ते ही शहराच्या प्रगतीची ओळख असते, त्यामुळे रस्त्याचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाले पाहिजे. निकृष्ट काम करणाऱ्यांबाबत कोणतीही तडजोड न करता कारवाई झाली पाहिजे, असे निर्देशही याप्रसंगी सबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी शिक्षणमंत्री दादाजी भुसे, मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार गोकुळ हिरे, महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, महापालिका आयुक्त मनिषा खत्री तसेच #शिवसेना – भाजप महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि नाशिककर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गंगापूर रोडला पर्याय रस्ता म्हणून या रस्त्याचे कामाचे उद्घाटन व भूमिपूजन झाल्याने गंगापूर रोड परिसरात मधील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून रस्त्याची समस्या लवकर सुटणार आहे..



