ब्रेकिंग

सिंहस्थ महा कुंभ भक्ती संगम कार्यक्रमाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.

प्रतिनिधी, नाशिक जनमत  ऑक्टोंबर मध्ये कुंभमेळा सुरू होत असून कुंभमेळ्याची तयारी चालू झाली आहे. नाशिकच्या ठक्कर डोम मैदानावर  तीन दिवसीय किर्तन प्रवचन चर्चा तीन दिवसीयसीयस  सिंहस्थ महा कुंभ  भक्ती संगम कार्यक्रमाचे उद्घाटन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की

 

सिंहस्थ कुंभमेळा केवळ धार्मिक सोहळा नसून, त्यातून सामाजिक अभिसरणाचे कार्य घडते. जगात कुठेही पाहायला मिळणार नाही, असे सामाजिक एकत्रीकरण कुंभमेळ्यातून होते. त्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर या पवित्र भूमीत सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याचे भाग्य नाशिककरांना लाभले आहे. कुंभमेळ्याच्या माध्यमातून होणारे सामाजिक अभिसरण, विचारांचे मंथन आणि चिंतन हेच खरे अमृत असून, जगाच्या पाठीवर असे अमृत कुठेच प्राप्त होत नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

कोणतेही विघ्न आले तरी कुंभनिर्विघ्न पार पाडू, असा विश्वास देत कोणत्याही परिवर्तनासाठी शिव्या खाव्याच लागतात, असे सांगत फडणवीस यांनी सिंहस्थ कामांवरून नाशिककरांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न यावेळी केला. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा

 

 

प्राधिकरणाच्या वतीने तीनदिवसीय ‘सिंहस्थ महाकुंभभक्तिसंगम’ कार्यक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जगात तोड नसलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याला प्राचीन परंपरा असून, सनातन विचारांच्या या कुंभमेळ्याचा उगम आणि अंत कोणालाही ज्ञात नाही. यजमान म्हणून कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू-महंत, तसेच भाविकांचे स्वागत करण्याची मोठी जबाबदारी नाशिककरांवर आहे. गोदावरी नदी निर्मल आणि अविरत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. व्यासपीठावर शालेय

 

 

शिक्षणमंत्री दादा भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, महापौर हिमगौरी आहेर-आडके, खासदार राजाभाऊ वाजे. आमदार राहुल ढिकले. आमदार देवयानी फरांदे आमदार  सीमा हिरे  राहुल आहेर आमदार सरोज अहिरे हिरामण खोसकर आमदार गोकुळ गीते इत्यादी उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे