ब्रेकिंग

ओझरला भरवस्तीत तरुणाचा खून; संशयित मित्र फरार

ओझरला भरवस्तीत तरुणाचा खून; संशयित मित्र फरार

 

 

नाशिक जनमत  ओझर येथील संभाजी चौक परिसरात एका तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील कमोद फोटो स्टुडिओसमोरील घरात तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. मृत तरुणाचे नाव विनोद विष्णू शेंद्रे (३४) असे आहे. तो मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब गावचा रहिवासी आहे. सध्या तो ओझर येथील एका किराणा दुकानात काम करत होता आणि एका मित्रासोबत राहत होता.

याबाबत वृत्त असे की, मृतदेहाच्या मानेवर गळा आवळल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे हा खूनच असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. घटना घडल्यानंतर त्याच्यासोबत राहणारा मित्र फरार झाला असून, पोलिसांना त्याच्यावर संशय आहे. घटनेची माहिती मिळताच ओझर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या प्रकरणी ओझर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिय सुरू आहे. फरार असलेल्या मित्राचा शोध पोलिस घेत आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे