मुंबईमध्ये मोहरममध्ये घातपातासाठी ‘पेनकिलर’ म्हणून उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्या.
भायखळा भागात मिरवणुकीत गोळ्या वाटल्याचे उघड. आरोपी पुणे येथील.

नाशिक जनमत मुंबई. व महाराष्ट्रात घातपात करण्यासाठी पुण्याच्या सुशिक्षित व्यक्तीने इम्युनिटी बूस्टर च्या नावाखाली उंदीर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या मिरवणुकीत वाटल्याचे उघड झाले आहे. मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा घातपात टळला आहे.
दक्षिण मुंबईतील भायखळा भागात मोहरमच्या अशुरा मिरवणुकीत पेनकिलर आणि इम्युनिटी बूस्टरच्या नावाखाली उंदीर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या झिंक फॉस्फाइडच्या विषारी गोळ्या वाटणाऱ्या पुण्यातील विमाननगर येथे राहणाऱ्या उच्चशिक्षित तरुण फय्याज निसार प्रेमजीला (३९) चटक करण्यात आली. त्याच्याकडून प्सूलरूपात तयार केलेल्या १४,९०० षारी गोळ्या आणि ५० किलो घातक सायनिक पावडर जप्त करण्यात नाली आहे. एका जागरूक महिलेची त्परता आणि रुग्णालयातील एमएलसी (मेडिको लीगल केस) अहवालामुळे या संपूर्ण प्रकरणाचा बर्दाफाश झाला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा घातपात टळला आहे. फय्याज निसार २०२५ मध्ये इराण-इराकमध्ये जाऊन आला होता. त्यामुळे त्याचे आयसिसशी काही कनेक्शन आहे. का याचा शोध घेतला जात आहे
फव्याज निसार प्रेमजी २०२५ मध्ये इराण, इराकला गेला होता. त्याची आई आणि बहीण सध्या इराणमध्ये राहतात. चौकशीत ही बाब समोर आल्यावर मुंबई पोलिस, एटीएस आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहे. सुरक्षा विश्लेषकांच्या मते, इराण-इराक हे शिया समुदायाचे केंद्र आहे. आणि. आयसिस हा सुन्नी वहाबी गट असल्याने फय्याजचा आयसिसशी थेट संबंध असण्याची शक्यता कमी आहे.तरीही पोलिस त्या दिशेने तपास करत आहेत. फय्याज बीबीए पदवीधारक असून त्याचे वडील पुण्यात नामांकित पेंट कंपनीचे मालक आहेत. घातपातासाठी तो १५ दिवसांपासून मुंबईत मुक्काम ठोकून विषारी कॅप्सूल्स तयार करत होता
मुंबई परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त जयंत मीणा यांनी सांगितले की, फय्याजने ऑनलाइन बाजारातून ३०,००० रिकाम्या कॅप्सूल्स आणि मोठ्या प्रमाणावर घातक रासायनिक पावडर
मागवली होती. तो स्वतः राहत्या ठिकाणी या रिकाम्या कॅप्सूल्समध्ये प्रत्येकी १-१ ग्रॅम झिंक फॉस्फाइड भरत होता.
मिरवणुकीत त्याने दिलेल्या गोळ्या खाल्ल्यावर काही जणांना उलट्या, मळमळ होऊ लागली. ही बाब एका महिलेच्या लक्षात आल्यावर तिने पोलिसांना माहिती तीस हजार कॅप्सूल गोळ्या बनवण्याची त्यांनी कबुली दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हदरला आहें.



