पुढील दोन-तीन दिवसात कोसळू शकतो मुसळधार पाऊस. हवामान खात्याचा अंदाज.
नाशिक जनमत गेल्या दोन-तीन दिवसापासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे . सध्या मार्च महिना चालू असला तरी बर उन्हाळ्यामध्ये पावसाचे वातावरण तयार झालेले आहे हे वातावरण पुढील दोन चार दिवस राहू शकते असे हवामानाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र कोकण विदर्भ इत्यादी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. मागील आठवड्यामध्ये तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेले होते उष्णतेची लाट राज्यांमध्ये आली होती दरम्यान तपमान 42 43 अंशापर्यंत गेल्याचे त्यानंतर अचानक अंदमान-निकोबार मध्ये पाऊस पडला व या नंतर महाराष्ट्रातील ढगाळ वातावरण व पावसाळी सदृश्य वातावरण तयार झाले आहे वातावरण झालेले आहे दरम्यान या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक कांदा उत्पादक तसेच गहू हरभरा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत भर उन्हाळ्यात वकाळी पाऊस येण्याची शक्यता शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत व शेतकरीवर्ग धास्तावला आहे