भाबड इंटरनॅशनल पब्लिकेशन आणि ए बि सी इंटरनॅशनल फॅमिली ची वर्ल्ड रेकॉर्डची हॅट्रिक
आकाश भाबड, भाबड इंटरनॅशनल पब्लिकेशन आणि ए बी सी डी इंटरनॅशनल फॅमिली ची वर्ल्ड रेकॉर्ड्स ची हॅटट्रिक!
आकाश भाबड यांच्या भाबड इंटरनॅशनल पब्लिकेशन च्या 75 ब्रॅण्ड अम्बॅसिडर ने मिळुन एक ऐतिहासिक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. हा वर्ल्ड रेकॉर्ड भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या (स्वातंत्र्य चा अमृत महोत्सव) पाश्र्वभूमीवर करण्यात आला आहे. भाबड इंटरनॅशनल पब्लिकेशन च्या विविध राज्यांतील सर्व 75 ब्रॅण्ड अम्बॅसिडर ने 1947 ते 2022 या 75 वर्षांत भारताची विविध क्षेत्रात झालेल्या उल्लेखनीय कार्याची, प्रगतीची, इतिहासाची, संस्कृतीची आणि अशा अनेक विषयांची त्यांच्या पुस्तकात नोंद केली. या पुस्तकाच अनावरण 6 ऑगस्ट 2022 रोजी विविध तज्ञ प्रमुख पाहुणे, उच्चशिक्षित ब्रॅण्ड अम्बॅसिडर आणि आकाश भाबड यांच्या सहकार्याच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमात आकाश भाबड यांना वर्ल्ड रेकॉर्ड चे सर्टिफिकेट, ट्रॉफी आणि मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. भाबड इंटरनॅशनल पब्लिकेशन आणि ए बी सी डी इंटरनॅशनल फॅमिली चा हा 3 रा विश्वविक्रम आहे. ह्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. टी. एन. सुरेश कुमार ( स्पेस रिसर्च शास्त्रज्ञ- इस्रो ), डॉ. प्रमोद कुमार राजपुत ( व्हाईस प्रेसिडेंट – कॅडीला फार्मासुटीकल लिमिटेड ), श्री. रविशंकर कुमार ( फाउंडर – आय डी वाय एम फाउंडेशन ), डॉ. दिनेश गुप्ता ( फाउंडर – आनंदश्री ऑर्गनायझेशन ), सौ. प्रतिभा मिश्रा (प्रिन्सिपल) आणि श्री. निशदिप सिंग (दिल्ली) हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे आणि आकाश भाबड यांच्या आईवडिलांनी दीपप्रज्वलन करून केली.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पुस्तक एकाच कंपनीच्या 75 ब्रॅण्ड अम्बॅसिडर ने मिळुन लिहले आहे.
या कार्यक्रमात एकुण 12 पुस्तक प्रकाशित करण्यात आले. आकाश भाबड, डॉ. प्रमोद कुमार राजपुत, श्री. शिवराज सिंग, श्रृती सिंग, नेहा शर्मा, सुनिता सिंग, शौर्य अस्थाना, सोनेश भारद्वाज, इशांत ठक्कर, प्रिती मेहरोत्रा, शेख अमनुल्ला शरीफ, डाॅ. रितु गुप्ता, सुमा श्रीधर ह्या सर्व विविध राज्यांतील लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्यात आली. या सर्व लेखकांचा मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात ब्युटी विथ ब्रेन या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला सर्वाची खुप पसंती मिळाली. सर्व उपस्थित ब्रॅण्ड अम्बॅसिडर चा सर्टिफिकेट, फेटा देवुन मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला.
आकाश भाबड हे भाबड इंटरनॅशनल पब्लिकेशन आणि ए बी सी डी इंटरनॅशनल फॅमिली चे फाउंडर आणि सीईओ आहेत. ते स्वतः एक इंटरनॅशनल ऑथर्स सक्सेस कोच आणि बिझनेस कोच आहेत. ते विविध क्षेत्रातील लोकांना आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून आपला बिझनेस आणि ब्रॅण्ड कसा वाढवायचा यासाठी मार्गदर्शन करतात. याशिवाय ते वर्ल्ड रेकॉर्ड्स सेट करण्यासाठी पण मार्गदर्शन करतात. पुढील काही दिवसात ते विविध क्षेत्रातील मान्यवरांसाठी विश्वविक्रम करनार आहेत.
या सर्व उपक्रमात भाबड इंटरनॅशनल पब्लिकेशन च्या कोर टीमचा खुप मो इंटरनॅशनल पब्लिकेशन आणि येलाचा वाटा आहे.