ब्रेकिंग

अॅमिनिटी प्लॉटच्या जागेवर परस्पर रोहाउस विक्री, मेन्टेनन्सचे कोट्यवधी रुपये हडप आमदार फरांदेंची लक्षवेधी, बडे पालिका अधिकारी गुंतल्याचा आरोप.

अॅमिनिटी प्लॉटच्या जागेवर परस्पर रोहाउस विक्री, मेन्टेनन्सचे कोट्यवधी रुपये हडप

आमदार फरांदेंची लक्षवेधी, बडे पालिका अधिकारी गुंतल्याचा आरोप

 

प्रतिनिधी |

 

नाशिक

 

तपोवनातील कर्मा हाइट्स बिल्डिंगमध्ये मूळ बांधकाम नकाशात बदल करून विवध अॅमिनिटीऐवजी रोहाउस बांधण्याच्या नावाखाली सुमारे ४.५० कोटी तर मेंटेनन्सपोटी २.२६ कोटींची रक्कम हडप केल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आमदार प्रा. देवयानी फरदि यांनी विधानसभा अधिवेशनामध्ये लक्षवेधी मांडली आहे. दुसरीकडे, संबंधित विकसकाविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मौजे आगरटाकळीत शिवाराज कर्मा गॅलेक्सी अपार्टमेंट असून या गृहसंकुलाची विक्री करताना मंजूर बांधकाम नकाशात क्रिकेट पीच, टेनिस कोर्ट, नाना-नानी पार्क अशाप्रकारच्या अॅमिनिटीज देण्याचे

 

(पालिका अधिकाऱ्यांना आरोपी करा

 

मागील काळामध्ये

 

अनधिकृतपणे अनेक ठिकाणी रहिवाशांची फसवणूक झाली असून त्यास मनपातील काही अधिकारी जबाबदार आहे. चौकशी करून त्यांनादेखील – देवयानी फरांदे, आमदार

सहआरोपी करा.)

 

आश्वासन देण्यात आले. २०२१ पर्यंत ८० हून अधिक म्हणजे ५० टक्क्यांपेक्षा अधिक सभासदांनी येथे घर खरेदी केले, या ग्राहकांना घर विक्री करताना मंजूर नकाशाचा आराखडाही जोडला आहे. मात्र रहिवाशांची परवानगी न घेता परस्पर नकाशात बदल करत अॅमिनिटीजच्या जागेवर रोहाउस बांधले. हे बांधकाम पाहून रहिवाशांनी तातडीने यावर हरकत घेत महापालिकेत धाव घेतल्यानंतर त्यांना प्रकल्पाचा मंजूर नकाश/दाखवण्यात आला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे