म्हसरूळ मध्ये एकाच इमारतीतील २ फ्लॅट फोडले, २.७३ लाखांची चोरी
पंचवटी म्हसरूळ परिसरामध्ये नागरिकांमध्ये घबराट
प्रतिनिधी | जनमत
नाशिक
गेल्या दोन महिन्यांमध्ये जवळपास सात ते आठ घटना म्हसरुळमध्ये घरफोडी च्या घरी आहे त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरलेले आहे. काल एका इमारतीमधील दोन बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. एका फ्लॅटमधून सोन्या-चांदीचे दागिने आणि दुसऱ्या फ्लॅटमधून रक्कम चोरी करण्यात आली. कल्पराज सोसायटी, गुलमोहरनगर येथे हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुभाषचंद्र जैन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते फ्लॅट नं. ७ मध्ये राहतात. फ्लॅट बंद असताना दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरांनी घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने चोरी केले. शेजारी राहणारे जालिंदर यादव यांच्याही दरवाजाचे कुलूप तोडून रक्कम चोरी केली. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हसरुळ परिसरामध्ये घरफोडी तसेच भुरट्या चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. यातच एकाच इमारतीतील दोन फ्लॅटमध्ये चोरी झाल्याच्या प्रकाराने परिसरातील रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. पोलिसांनी या भागात गस्त घालावी, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.