अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर. तलवारीने फोडली आठ गाड्या. घरांवर केली दगडफेक. नागरिक भयभीत.
प्रतिनिधी | नाशिक जन्मत नाशिक शहरातील प्रत्येक भागामध्ये भाईगिरी गुन्हेगारी वाढत असून मागील महिन्यात सहा खून झाले आहे आहेत. तर अनेक ठिकाणी घरफोडी लूट मार हाणामारी यांच्या घटना मोठ्या प्रमाणात घडले आहेत. आता अल्पवयीन मुलांना टोळ्यांमध्ये
घेऊन त्यांच्या गुन्हेगारीसाठी उपयोग केला जात असल्याची घटना समोर येत आहे. पोलीस देखील त्यांच्यावर कठोर कारवाई करत असल्याने खुलेआम गुन्हेगारी वाढत आहे अशीच घटना काल
संजीवनगर, अंबडच्या आझादनगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवारी (दि. १८) पहाटेपर्यंत येथील अल्पवयीनांसह गुंडांनी तलवार, कोयत्याने आठ वाहनांची तोडफोड केली, लोकांच्या घरांवर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या. यामुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे. पोलिसांनी चार अल्पवयीनांना ताब्यात घेतले असले तरी म्होरक्या मात्र फरार आहे.
या घटनेमुळे या परिसरातील नागरिक महिला भयभीत झाले आहे.
हातात तलवारी नाचवत, कोयते उगारत, शिवीगाळ करत गल्ल्यांमधून गुंड बिनधास्त हिंडतात, सामान्य नागरिकांच्या कष्टाने घेतलेल्या वाहनांची तोडफोड करून हजारोंचे नुकसान करत म्होरक्या पसार होतो आणि पोलिस थातूरमातूर काहीतरी कारवाईचा देखावा करत असल्याने अंबडच्या नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. अंबडमधील घटनेबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व रहिवासी अमीन हारुण खान (रा. आझादनगर) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास आझादनगरमध्ये अचानक सात ते आठ जणांच्या टोळक्याने या परिसरातील मोठ्याने आवाज करत शिवीगाळ करत तलवारी व इतर हत्याराच्या साह्याने चार ते पाच गाड्या फोडल्या. जवळपास दोन लाखाचे नुकसान केले. आणि घरांच्या दरवाज्यावर दांडूक्यांनी मारले. त्यामुळे गार झोपेत असलेले नागरिक भयभीत झाले. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी या परिसरातील नागरिक करत आहे.