नांदगाव येथे शिवसेना कार्यकर्ता मेळावा साकोरा येथे आनंदी वातावरणात.
शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात मी आमदार असल्याची हवा डोक्यात जाऊ देणार नाही
— आमदार सुहास अण्णा कांदे
अरुण हिंगमीरे
नांदगाव, नाशिक
*आमदार सुहास आण्णा कांदे* यांच्या उपस्थितीत नांदगाव तालुक्यातील साकोरा जिल्हा परिषद गटाचा शिवसेना कार्यकर्ता मेळावा साकोरा येथे घेण्यात आला.या मेळाव्यास मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. *भविष्य काळातील निवडणुका आणि कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी या विषयावरती या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.*
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सामाजिक क्षेत्रातील डझनभर पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.या मध्ये महेंद्र गायकवाड, भावडू गीते, वाल्मीक अहिरे, सुरेश बोरसे, अण्णा सुरसे, राजेंद्र चवर, निलेश सुरसे, एकनाथ मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे आमदार कांदे व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी मार्गदर्शन करतांना, शरीरात रक्ताचा शेवटच्या थेंब असे पर्यंत आपले उपकार विसरणार नाही, मरेपर्यंत कधी डोक्यात आमदार असल्याची हवा जाऊ देणार नाही, मी आपला सेवक आहे आणि आणि आपली सेवा करणे हेच माझे कर्तव्य आहे, अशा शब्दांनी आमदारांनी उपस्थितांची मने जिंकली. व यांनी शिवसैनिकांनी कमालीचे प्रोत्साहित केले.येणाऱ्या निवडणुका यशस्वी पर पाडण्यासाठी सगळे हेवे दावे बाजूला ठेवा आणि शिवसेना पक्षाचे उमेदवारच विजयी होतील असे काम करा असे आवाहन या वेळी त्यांनी केले.
नांदगाव येथे जुनी पंचायत समिती जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व भव्यदिव्य अशी शिवसृष्टी उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तांडा शर्यतीत प्रथम आलेल्या व्यक्तीला सन्मानित करण्यात आले
याप्रसंगी मंचावर जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे पंचायत समिती सभापती सुभाष कुटे,सदस्य सौ सुमनताई निकम, राजाभाऊ जगताप, श्री विष्णू निकम सर,शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, गुलाब भाबड, अमोल नावंदर, शहरप्रमुख सुनील जाधव, युवा सेना तालुका प्रमुख सागर हिरे, साकोरा गट प्रतिनिधी सूरज बोरसे यांच्यासह साकोरा जिल्हा परिषद गटातील सर्व ग्रामपंचायत सरपंच, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.