अंध सुरदासच्या वाढदिवसाने फुलले चेहऱ्यावरचे हास्य..
*अंध सुरदासच्या वाढदिवसाने फुलले चेह-यावर हास्य,*
*दैवी नैसर्गिक अत्याचाराचा बळी ठरलेला दिव्यांग घटक व त्यात दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याने संपुर्ण आयुष्यच अंधकारमय, समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन ही वेगळा, तरीही चेह-यावर हास्य फुलवून आलेल्या संकटांशी दोन हात करणारा तरुण अंध युवक सुरदास,*
*नाशिक शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या खेरवाडी या वस्तीतील दोन्ही डोळ्यांनी अंध सुरदासचा वाढदिवस साजरा केला, समाजातील दुर्लक्षित व सर्वात दुर्बल घटक असलेल्या दिव्यांग व अंध व्यक्तींचा वाढदिवस साजरा होणं ही दिव्यांगांसाठी पर्वणीच आहे, व यातुन दिव्यांगांचे चेह-यावर फुलणारा आनंद यापेक्षा दुसरा आनंद नाही ही बाब हेरुन आज खेरवाडी येथील अंध बाधव सुरदासचा वाढदिवस असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तुजी बोडके यांना मिळाली होती. रविंद्र पाटील यांनी सुरदासला वाढदिवसाच्या निमित्ताने नवीन कपडे घेण्यात आले व केक कापून आनंदीआनंद वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आल्याने सुरदासच्या आनंद गगनात मावेनासा झाला व प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढदिवस साजरा होत असल्याने सुरदासला गहिवरून आले, या प्रसंगी दत्तु बोडके, रविन्द्र पाटील, बबलु मिर्झा, ललित पवार, रुपेश परदेशी, समाधान बागल, सागर बोडके आदी सह दिव्यांग बांधव उपस्थित होते.*