ब्रेकिंग
विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न .
वृत्त.क्र.७
दि.२६ जानेवारी २०२२
*विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न*
नाशिक जनमत भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी अपर आयुक्त भानुदास पालवे, अपर जिल्हाधिकारी तथा महसूल प्रबोधनिच्या संचालिका गीतांजली बाविस्कर, उपायुक्त (सामान्य प्रशासन) रमेश काळे, उपायुक्त(महसूल) गोरक्ष गाडीलकर, उपायुक्त (नियोजन) प्रदीप पोतदार, नगररचना विभागाच्या सहसंचालक सुलेखा वैजापूरकर, उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, सहायक आयुक्त कुंदन सोनवणे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
०००००००००