सुवर्णकन्या डॉक्टर मिथिला चव्हाण यांचा सत्कार
सुवर्णकन्या डॉ. मिथिला चव्हाण यांचा सत्कार
नाशिक:
शहरातील आडगाव नाका येथील रहिवासी डॉ.मिथिला चव्हाण या सुवर्णकन्या बनल्या असून त्यांनी जिंकलेल्या ४ सुवर्णपदकाबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटना व डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला.
तुर्की मधील इस्तांबुल शहरात दि.२४ ते ३०डिसेंबर दरम्यान आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. २३ फेब्रुवारी २०२० मध्ये होणारी ही स्पर्धा कोरोनाच्या संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत नाशिकच्या सुवर्णकन्या डॉ.मिथिला चव्हाण यांनी चार सुवर्ण पदके जिंकुन नाशिकचे नाव देशभरात उंचावले आहे. यावेळी
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष व डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचे नाशिक जिल्हा समन्वयक बाळासाहेब सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास पांडे मिठाईच्या संचालिका व भटक्या विमुक्त संघटनेच्या पदाधिकारी कल्पना पांडे व चव्हाण कुटुंबिय उपस्थित होते.
फोटो
नाशिकः सुवर्णकन्या मिथिला चव्हाण यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष व डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनचे नाशिक जिल्हा समन्वयक बाळासाहेब सोनवणे. पांडे मिठाईच्या संचलिका कल्पना पांडे आदी.