नांदगाव येथे श्री बाबा रामदेव अवतार दीन उत्साहात साजरा

नांदगाव येथे श्री बाबा रामदेव अवतार दीन उत्साहात साजरा
अरुण हिंगमिरे
पत्रकार नांदगाव
नाशिक
श्री बाबा रामदेव पीर यांचा अवतार दिन नांदगाव गुप्ता लॉन्स येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
बाबा रामदेव भक्त परिवार तर्फे जम्मा जागरण चे आयोजन करण्यात आले होते, आमदार सुहास आण्णा कांदे तसेच नगराध्यक्ष राजेश जी कवडे यांनी याप्रसंगी उपस्थिती लावली.
श्री बाबा रामदेव जी जन्मोत्सव निमित्त भक्त मंडळ तर्फे सायंकाळी पाच वाजता गांधी चौक येथून भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली होती .सायंकाळी ६ वाजता महाआरतीची आयोजन करण्यात आले, व रात्री जन्मोत्सव आणि अमृत कथेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी रिती प्रदीप गुप्ता (सपत्निक) व आमदार सुहासअण्णा कांदे, राजेशजी कवडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली.
यावेळी बाबा रामदेव भक्त मंडळातर्फे आमदार सुहास अण्णा कांदे व राजेशजी कवडे यांचे स्वागत करण्यात आले. तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखात सण उत्सव तसेच धार्मिक कार्यक्रमात सतत उपस्थिती लावणारा आमदार आम्हाला मिळाल्याचा खूप आनंद आहे असे ज्योती प्रसाद अग्रवाल यांनी मत व्यक्त केले.
आमदार सुहास अण्णा कांदे यांनी आपल्या मनोगतात श्री बाबा रामदेव भक्त मंडळाने केलेल्या मागणीनंतर श्री बाबा रामदेव यांच्या मंदिरासाठी दहा लाख रुपये निधी देणार असल्याचा जाहीर केले.
या प्रसंगी ज्योती प्रसाद अग्रवाल अंकुश सुराणा, लालू दरडा ,जितू गुप्ता, डॉक्टर विशाल पारख, हर्षल खीलोसिया, पप्पू भटेवरा, प्रदीप गुप्ता, डॉ.परितोष गुप्ता, सचिन फोफलीया, केतन करवा, आर्य फोफलीया, शुभम अग्रवाल, दिनेश ओचानी, लक्ष्मीनारायण शर्मा, संजय भावसार तसेच मोठ्या संख्येने बाबा रामदेव भक्त उपस्थित होते.