ब्रेकिंग

नासिक मध्य विधानसभा मतदारसंघातील पदवीदारांनी मतदार नोंदणी करावी. जिल्हाधिकारी

: 14 ऑक्टोबर, 2022

*नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील*

*पदवीधरांनी मतदार नोंदणी करावी*

*-जिल्हाधिकारी गंगाथरन डी.*

 

*नाशिक जनमत नाशिक पदवीधर मतदारसंघातील, दिनांक: 14 ऑक्टोबर, 2022(जिमाका वृत्तसेवा):* भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या मतदार याद्या नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ (124) मधील पदवीध रांनी पदवीधर मतदार संघासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी गंगाथरन डी.यांनी केले आहे.

 

पदवीधर मतदान नोंदणीचे काम 1 ऑक्टोबर, 2022 पासून सुरू झाले असून 7 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. त्यानंतर 23 डिसेंबर, 2022 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदार यादीबाबत दावे व हरकती 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर, 2022 पर्यंत स्वीकारण्यात येणार असून पदवीधर मतदार अंतिम मतदार यादी ही 30 डिसेंबर, 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

 

*असे आहेत पदवीधर मतदार नोंदणीकरिता निकष व पात्रता:*

▪️ भारताचा नागरिक असावा

▪️ मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवाशी असावा

▪️ नोंदणीसाठी असलेला नमुना-18 हा मराठी अथवा इंग्रजीत परिपूर्ण भरलेला असावा.त्यावर पासपोर्ट साइज फोटो चिकटवावा.

▪️ 1 नोव्हेंबर, 2019 च्या किमान तीन वर्षे आधी भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पदवी प्राप्त पदवीधर असावा.

▪️ पदवीची स्वत: साक्षांकित केलेली प्रत रहिवास पुराव्याच्या छायांकित प्रतीसह सादर करावी मात्र नमुना-18 जमा करतांना पदवीची मुळ प्रत दाखविणे आवश्यक आहे.

 

*नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ (124) साठी अर्ज वाटप व स्वीकृतीची ठिकाणे*

▪️ मंडळ अधिकारी कार्यालय,नाशिक

▪️ मनपा शाळा क्रमांक 40 जुने नाशिक, फुले मार्केट नाशिक

▪️ मनपा शाळा क्रमांक 39 नागझरी कठडा नाशिक

▪️ गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल (शासकीय कन्या विद्यालय नाशिक)

▪️ रमाबाई आंबेडकर शाळा, गडकरी चौक, नाशिक

▪️ मनपा शाळा क्रमांक 43 काठेगल्ली, नाशिक

 

सन 2023 च्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी प्रथमच मतदार नोंदणी नमुना-18 अर्जात मतदारांना आपला आधार क्रमांक देता येणार आहे परंतु आधार क्रमांक देणे ऐच्छिक असल्याचेही, जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी गंगाथरन डी. यांनी कळविले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे