राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियाना अंतर्गत हरभरा पिकासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत. विवेक सोनवणे.
*दिनांक: 13 ऑक्टोबर, 2022*
*राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत हरभरा पिकासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत*
*-विवेक सोनवणे*
*नाशिक, दिनांक: 13 ऑक्टोबर, 2022(जिमाका वृत्तसेवा):*
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत नाशिक तालुका कार्यक्षेत्रतील शेतकऱ्यांसाठी हरभरा पीकाकरिता पिक प्रात्यक्षिक व बियाणे वाटप कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रामात सहभाग घेण्यासाठी शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी 17 ऑक्टोबर, 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी कळविले आहे.
या अभियानांतर्गत 2022-23 वर्षाकरिता हरभरा पिकासाठी पीक प्रात्याक्षिके, बियाणे वाटप, जैविक खते, सुक्ष्म मुलद्रव्ये, एकात्मिक कीड व्यवस्थापन इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी महिला शेतकरी व महिला गट, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी व वैयक्तिक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, नाशिक येथे दिलेल्या मुदतीत विहीत नमुन्यात अर्ज सादर करावयाचे आहेत. तसेच शेतकऱ्यांना महाडिबीटी संकेतस्थळावरील फार्मर लॉगीन या पर्यायावर ऑनलाईन अर्ज देखील सादर करता येणार आहेत. अर्जा सोबत 7/12 उतारा, आधार कार्ड व संपर्क क्रमांक देणे आवश्यक असेल.
लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 18 ऑक्टोबर ,2022 रोजी सकाळी 11.00 वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालय, शिंगाडा तलाव, कृषी भवन स्तरावर सोडत काढून ज्येष्ठता सूचीनुसार पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. तसेच निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्याला तालुका स्तरावरून पुढील नियोजन कळविण्यात येईल.