नांदगावच्या गंगाधरी येथे एसटी व अल्टो कारचा अपघात तीन ठार एक बालक गंभीर जखमी.
नाशिक जनमत आज सकाळी मनमाड डेपोची चाळीसगाव कडे जाणारी एसटी बस व नाशिकहून जळगाव कडे जाणाऱ्या शिंदे पळसे गावातील नलवाडे परिवाराची अल्टो कार यांची गंगाधरी गावाजवळ एसटी व कारची समोरासमोर धडक झाली यामध्ये दोन महिलांसह एक पुरुष जागीच ठार झाले. दोन जखमी माड सांगवी येथील असल्याचे सूत्रांची बातमी आहे. आमदार सुहास अण्णा कांदे. हे घटनास्थळावर ताबडतोब जाऊन जखमींना रुग्णालयात पाठवण्यासाठी मदत केली. दरम्यान हा अपघात झाल्याने नांदगाव व नलवाडे परवारावर शोक कळा पसरली आहे. जखमी बालकास नाशिक येथे उपचारासाठी देण्यात आल्याची कळते. दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. अल्टो कार मधील आई वंदना संतोष नलवाडे व 40 मुलगा शुभम संतोष नलावडे व 23 राहणार शिंदे पळसे तर मुलगी कल्याणी मनोज शिंदे वै 22 राहणार महाड सांगवी या अपघातामध्ये जागी ठार झाले आहे . तीन वर्षे बालक जखमी असून उपचारासाठी नाशिकला रवाना केले आहे.