दिंडोरी 40 लाखाची लाच मागणारा प्रांत अटकेत.

नाशिक जनमत. प्रतिनिधी एसीबीने दिलेल्या माहितीनुसार लखमापूर फाट्यावर न्यूट्रिशन बनवणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे चार वेगवेगळे प्रकल्प आहेत कर्करोग किडनी हृदयरोगासारख्या आजारावरील रुग्णांना आवश्यक असणारे
न्यूट्रिशन येथे बनण्यात येत असून शेकडो कामगारांना यामुळे रोजगार मिळालेला आहे. दरम्यान या कंपनी व्यवस्थापनाने बांधकाम करताना अकृषक दाखला न घेतल्यावरून थेट कंपनीचे उत्पादन बंद करण्याचा इशारा देत कारवाई टाळण्याचा मोबदल्यात थेट 40 लाखाची लाच मागणारा संशयित प्रांत अधिकारी डॉक्टर निलेश आप्पा याला काल अटक करण्यात आली यावेळी लाखो रुपये प्रतिबंधक विभागाने दिंडोरी कार्यालयाचा सापला रचून बुधवारी सायंकाळी कारवाई केली. दिंडोरी उपविभागीय अधिकारी म्हणून संशयित डॉक्टर निलेश अपार याची फेब्रुवारीतच नियुक्ती झाली होती महसूल विभागाच्या बदल्यात अकोला प्रांताधिकारी पदावरून त्याची दिंडोरी प्रांत अधिकारी पदी बदली झाली होती तर पूर्वी तो मेकर चा प्रांत होता. डॉक्टर आप्पार याचा काल बुधवारी शासकीय विश्राम गृह येथे मुक्काम असल्याने एसीबीच्या पथकाने तेथे झडती घेतली.. काल बुधवारी दिंडोरी येथे प्रांत कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होती विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात विविध दाखल्यासाठी आले होते दुपारपर्यंत दोन वाजेपर्यंत कार्यालय सुरळीत चालू होते त्यामुळे गर्दी असल्याने रांगेतच सर्व येणे जाणे चालू होते दरम्यान एका गाडीत चार अनोळखी इसम आले आणि कुणाची परवानगी न घेता ते गेले. यावेळी अनेक जणांनी त्यांना हटकले आपला वशीला आहे का असे बोलले दरम्यान थोड्यावेळाने शिपायाला सांगितले की तुमच्या ऑफिसमध्ये विशेष पाहुणे आले आहेत आणि साहेबांच पाहुणचार घेत आहे. दरम्यान ज्यांचे दाखले आहेत त्यांनी सेतूमध्ये संपर्क साधावा आता तुम्ही तू निघून जा साहेब तुम्हाला भेटणार नाही त्यांचा पाहुणचार सुरू आहे असे सांगितल्याने एकच खळबळ या ठिकाणी उडाली होती दरम्यान व पारदर्शक कारभार या निमित्ताने दिसून आला असून नाशिक जिल्हा महाराष्ट्र मध्ये गाजत आहे. दरम्यान या घटनेने मोठ्या प्रमाणात खळबळ उडली आहे.