मंत्री छगन भुजबळांमुळेच मांजरपाडा प्रकल्प झाला, तालुका जलसमृद्ध झाला.
*मंत्री छगन भुजबळांमुळेच मांजरपाडा प्रकल्प झाला, तालुका जलसमृद्ध झाला*
*विनायक भोरकडे यांचे ठाम प्रतिपादन*
*Nashik janmat. येवला,दि.७नोव्हेंबर-* तब्बल ५० वर्षे रखडलेला मांजरपाडा प्रकल्प कार्यान्वित करुन छगन भुजबळ यांनी येवला तालुक्याला जलमृद्ध केले आहे. तालुक्याचा दुष्काळी शिक्का पुसून काढला आहे. ही बाब अतिशय महत्वाची आहे, असे ठाम प्रतिपादन शेतकरी नेते विनायक भोरकडे यांनी केले.
भोरकडे पुढे म्हणाले की, येवला मतदारसंघाचा विकास करण्याची क्षमता केवळ आणि केवळ छगन भुजबळ यांच्याकडेच आहे. विकासाचा भक्कम असा भुजबळ पॅटर्न त्यांच्याकडे आहे. त्यांच्यामुळेच मांजरपाडा प्रकल्प पूर्ण होऊ शकला. गेल्या ५० वर्षांपासून या प्रकल्पाची मागणी होती. मात्र, सरकार दरबारी कुणाचेही वजन चालत नव्हते. छगन भुजबळ यांनी भक्कम प्रयत्न करुन या प्रकल्पाची प्रशासकीय मंजुरी आणली. शिवाय हा प्रकल्प केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात आणला. त्यामुळेच तालुक्याच्या सर्व भागात पाणी उपलब्ध झाले आहे. पिण्यासाठी आणि शेतीसाठीही पाणी मिळते आहे.
येवला तालुक्यातील विविध प्रशासकीय इमारती असो की शिवसृष्टी सर्वच प्रकल्पांमधून भुजबळ यांचे व्हिजन दिसून येते. सर्वच क्षेत्रात येवला तालुक्याने भरारी घेतली आहे. त्यात भुजबळ यांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्या पाठिशी भक्कम राहिल पाहिजे. त्यांना सलग पाचव्यांदा विक्रमी मतांनी निवडून द्यावे, असे आवाहनही भोरकडे यांनी केले आहे.