नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फ *नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार* *रणजीपटू राजेंद्र लेले यांना जीवन गौरव पुर साकार विलास गोडबोले यांचे ट्रेन द ट्रेनर शिबिर संपन्न*

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फ
*नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार*
*रणजीपटू राजेंद्र लेले यांना जीवन गौरव पुर साकार विलास गोडबोले यांचे ट्रेन द ट्रेनर शिबिर संपन्न*
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे नाशिक क्रिकेट साठी अमूल्य असे योगदान दिल्याबद्दल *रणजीपटू राजेंद्र लेले यांना जीवन गौरव पुरस्कार* प्रदान करण्यात आला आणि *नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा जाहीर सत्कार* करण्यात आला. तसेच नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन व केन्सिंग्टन क्लब यांच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील क्रिकेट प्रशिक्षक यांना ऍडव्हान्स ट्रेनींग च्या दृष्टिकोनातून मुंबईचे विख्यात क्रिकेट प्रशिक्षक विलास गोडबोले यांनी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या प्रशिक्षकांसाठी खास आयोजित ट्रेन द ट्रेनर हे दोन दिवसीय सेमिनार, मार्गदर्शन शिबिर यशस्वीरीत्या संपन्न झाले. या उपक्रमात सहभागी प्रशिक्षक यांना प्रशस्ती पत्रक वितरण व त्याबरोबरच गोडबोले सर यांचे क्रिकेट कोचिंग अँड बियाँड हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला आणि नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने सन २०२३/२०२४ मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण सोमवारी सायंकाळी गुरुदक्षिणा हॉल येथे दिमाखात पार पडले.
याप्रसंगी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा यांनी समयोचित प्रास्ताविक भाषण केले. त्याबरोबरच माजी चेअरमन विलासभाऊ लोणारी यांचेसह केन्सिंग्टन क्लबचे विक्रांत मते, खासदार राजाभाऊ वाजे, रणजीपटू राजेंद्र लेले व मुंबईचे विख्यात क्रिकेट प्रशिक्षक विलास गोडबोले यांनीदेखील आपले मनोगत व्यक्त केले. या दिमाखदार कार्यक्रमाचे सूत्र संचालन नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी समीर रकटे यांनी केले. यावेळी नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे आजीव सभासद , प्रशिक्षक, खेळाडू व त्यांचे पालक उपस्थित होते.