नासिक ते भगवानगड नवीन शिवशाही बस मिळावी अशी भाविकांची मागणी.
नाशिक जनमत. गेल्या दोन महिन्यापूर्वी नाशिक ते भगवानगड शिवशाही बस चालू झाली असून या बसला प्रवाशांचा व भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान या बस ची अवस्था खराब असल्याने ही बस अनेकदा प्रवासादरम्यान अंडर रिपेअर होऊन रस्त्यातच पडत आहे यामुळे प्रवासी वर्ग यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. दरम्यान ही बस बदलून या ठिकाणी नवीन शिवशाही बस चालू करावी यासाठी आमदार बाळासाहेब सानप तसेच मंत्री श्री छगन जी भुजबळ हे देखील प्रयत्न करत आहे. तसेच शशिकांत घुगे व वंजारी समाजाच्या वतीने एसटी महामंडळाला निवेदन देखील देण्यात आलेले आहे. लवकरच एसटी महामंडळातर्फे शिवशाही बस चालू करण्याच आश्वासन देण्यात आलेले आहे. लवकरात लवकर ही बस चालू करून भाविकांना सुविधा मिळावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. वंजारी समाजाचं श्रद्धास्थान व देवस्थान पंढरी समजल्या जाणाऱ्या भगवानगड येथे नाशिक नगर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भावीक् भगवानगड येथे जात असतात. तसेच या भागात असलेले मढी देवस्थान मोठा देवी गहिनीनाथ गड इत्यादी ठिकाणी भाविक हे नेहमीच जात असतात. नाशिक ते भगवानगड बस चालू
हीच ती बस आहे
झाल्याने प्रवाशांमध्ये मोठा आनंद केला गेला. मोठ्या प्रमाणात प्रवासी देखील या बसला मिळत आहे. दरम्यान बस चा मेंटेनेस नीट होत नसल्याने नेहमी रस्त्यात बसचा बिघाड होत असल्याने भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लवकरात लवकर नवीन बस देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय उत्सव समिती व भाविकांनी केली आहे. राष्ट्रीय उत्सव समिती च्या वतीने
प्रत्यक्ष विधि सल्लागार अॅड सुरेश आव्हाड अणि राष्ट्रीय उपाध्यक्ष महिला आघाडी च्या माया ताई बुरकूल ह्यानी देखील डेपो मॅनेजर कडे तेथे जाऊन पाट पुरावा केला व प्रवाशांची अडचण समजून सांगितली