ब्रेकिंग

बिबट्या हल्यात दहा वर्षे मुलाचा मृत्यू. वन विभागाचा हलगर्जीपणा. पिंजरा लावला नाही.

नाशिक जनमत. सिन्नरच्या गोंदे येथे बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षी मुलाचा मृत्यू झाला आहे. रात्री झोपण्यापूर्वी लघुशंकेसाठी बाहेर गेलेल्या प्रफुल्ल रवींद्र तांबे यास बिबट्याने आपल्या जबड्यात उचलून पलायन केले. यात त्याचे निधन झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील गोंदे येथे पंधरा दिवसां पूर्वी बिबट्याने याच वस्तीवर हल्ला केला होता. दरम्यान वन विभागाला ही माहिती देण्यात आली होती. तरी देखील वन विभागाने पिंजरा न लावल्याने  ही घटना घडल्याचे नागरिक बोलत आहे. रवींद्र हे तांबे हे दोन मुलांन सह वस्तीवर राहतात. गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे सर्वजण जेवण करून झोपण्याची तयारी करत होते. यावेळी प्रफुल्ल हा लघुशंकेसाठी बाहेर गेला होता. यावेळेस बिबट्याने त्याच्यावर झडप घालून शेतात नेल. दरम्यान मोठा आवाज आल्याने सर्व कुटुंबीय शेताकडे पळाले. त्यानंतर बिबट्याने प्रफुल्ल याला सोडून पळ काढला. कुटुंबीयांनी जखमी झालेल्या प्रफुल्ला रुग्णालयात उपचारासाठी नेले .दरम्यान डॉक्टरांनी त्यास मृत्यू घोषित केले या घटनेमुळे गोंदेगाव वर शोक काळा पसरले आहे. रात्रीच प्रफुल्लवर अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या पंधरा दिवसापासून या बिबट्याचा या परिसरात वावर असून आता तरी वन विभागाला जाग येईल का असा संतप्त सवाल गोंदे परिसरातील नागरिक करत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे