ब्रेकिंग

जलशक्ती अभियान उपक्रमांतर्गत केंद्रीय पथक जिल्हा दौऱ्यावर*

 

 

*जलशक्ती अभियान उपक्रमांतर्गत केंद्रीय पथक जिल्हा दौऱ्यावर*

*नाशिक, दिनांक 4 सप्टेंबर, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) :* केंद्र पुरस्कृत जलशक्ती अभियान कॅच द रेन उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध विभागांनी केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी 4 ते 6 सप्टेंबर 2024 या तीन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर केंद्रीय पथक आले आहे. या दौऱ्यात जिल्ह्यातील काही निवडक गावांना भेटी देवून बैठकांद्वारे जलजीवन मिशन योजनेतील व नदी नाल्यांच्या खोलीकरणासह जलसंधारणाच्या कामांची पाहणी केंद्रीय पथक करणार असल्याची माहिती जलशक्ती अभियान समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी अ.वि.कापडणीस यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

 

जिल्ह्यातील विविध विभागांनी जलशक्ती अभियानातून केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्ली येथील केंद्रीय भूमी संसाधन विभागाचे सहसचिव नितीन खाडे, तांत्रिक अधिकारी निर्मलकुमार नंदा या दोन तज्ज्ञ सदस्यांच्या केंद्रीय पथकासोबत जिल्हाधिकारी जलज शर्मा व प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरीभाऊ गिते उपस्थित राहणार आहेत.

 

जलशक्ती अभियान कॅच द रेन ही एक कालबद्ध मोहीम असून ही मोहीम 9 मार्च ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. यात जलसंधारण आणि पावसाचे पाणी साठवण, पारंपरिक आणि इतर जलस्त्रोत तसे मुख्य जलसाठ्याचे नूतनीकरण, जलसंरचनेचा पुनर्वापर आणि पुनर्भरण, पाणलोट क्षेत्र विकास करणे आणि संघन वनीकरण या पाच घटकांचा समावेश आहे.

000000

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे