नंदिनी वाचवा नाशिक वाचवा. अखेर निसर्गसेवक युवा मंचच्या लढ्याला यश.
नंदिनी वाचवा नाशिक वाचवा
अखेर युवा मंचच्या लढ्याला यश..
नाशिक जनमत “”निसर्गसेवक युवा मंचतर्फे संस्थापक अध्यक्ष श्री अमित कुलकर्णी यांनी नाशिक महानगरपालिका यांच्याकडे नंदिनी नदीचा समावेश नमामि गोदा प्रकल्पत करण्यात यावा व नदिवरील सर्व पुलांवर संरक्षक जाळ्या बसविण्यात याव्या व नंदिनी नदीला जोड़णारे नैसर्गिक नाले यांचे सीमा रेखांकन करण्यात यावे अशी मागणी अनेक दिवसापूर्वी करण्यात आली होती त्याविषयी नाशिक महानगर पालिका उत्तर किंवा प्रतिसाद देत नसल्यामुळे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, मुख्यसचिव श्री भूषण गगरानी यांच्याकडे यविषयी तक्रार करण्यात आली होतो, मा.मुख्यमंत्री यांनी या तक्रारीची/मागणीची दखल घेत नाशिक महानगर पालिका आयुक्त श्री पुलकुंडवार यांना यविषयी त्वरित कारवाई करुण उत्तर देण्यास सांगितले होतो.
त्या अनुशांगाने आज निसर्गसेवक युवा मंच संस्थापक अध्यक्ष श्री अमित कुलकर्णी यांना कारवाई बाबत पत्र प्राप्त झाले असून यात प्रमुख दोन मागन्या झाल्या आहे नंदिनी नदीसह गोदावरी नदीच्या सर्व उपनद्यांचा नमामि गोदा प्रकल्पत समावेश करण्यात आला आहे यात सांडपानी आड़वणे वळवणे,क्षमते नुसार मलनिसारण केंद्र बांधने, नद्यांचा किनारा विकासित करने, घाट बांधने, गयाबलियान वॉल बांधने आदि प्रमुख कामे यात घेण्यात आली आहे व त्याचप्रमाने नंदिनी नदीसह गोदावरी व तिच्या सर्व उपनद्या यांच्या पुलांवर संरक्षक जाळ्या बसवन्या सन्दर्भत सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक महानगरपालिका यांना सांगण्यात आले आहे.
त्यामुळे लवकरच नंदिनी नदीसह गोदावरी व तिच्या उपनद्या यांच्या पुलांवर संरक्षक जाळ्या बसविण्यात येतील.
या खुप दिवसापासून प्रलंबित असलेल्या मागन्या मान्य झाल्यामुळे सर्व नदी प्रेमी व पर्यावरण प्रेमी यांनी आनंद झाला आहे.
*यामुळे नंदिनी नदी व गोदावरी सह तिच्या उपनद्या प्रदुषण मुक्त होण्यास मदत होणार आहे असे मत श्री अमित कुलकर्णी यांनी व्यक्त केले.*