अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यम शाळेत* *प्रवेशासाठी 15 मे पर्यंत अर्ज सादर करावेत*
*अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यम शाळेत*
*प्रवेशासाठी 15 मे पर्यंत अर्ज सादर करावेत*
*: प्रकल्प अधिकारी जितीन रहमान*
*नाशिक: दिनांक 12 एप्रिल, 2024 (जिमाका वृत्तसेवा):*
आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक प्रकल्प क्षेत्रातील पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, येवला, निफाड, इगतपुरी, सिन्नर या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी 15 एप्रिल 2024 पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, आदिवासी विकास भवन, जुना आग्रा रोड, गडकरी चौक नाशिक येथे अर्ज सादर करावेत, असे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जितीन रहमान यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी उपरोक्त नमूद कार्यालयात पाल्याचा जन्म दाखला व पालकाचा सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला 15 एप्रिल, 2024 पर्यंत सादर केल्यानंतर प्रवेश अर्ज विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येईल. प्रवेश अर्ज परिपूर्ण भरून 15 एप्रिल 2024 पर्यंत प्रकल्प कार्यालय, नाशिक येथे सादर करावा.
पात्र अर्ज असणाऱ्या पालकांनी व पाल्यांनी कागदपत्र पडताळणीसाठी पेठ, इगतपुरी, सिन्नर, नाशिक तालुक्यातील पालकांनी व पाल्यांनी 24 मे 2024 रोजी तर त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, येवला, निफाड तालुक्यातील पालकांनी व पाल्यांनी 25 मे 2024 रोजी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय नाशिक येथे सकाळी 10 वाजता उपस्थित राहावयाचे आहे. त्याचप्रमाणे मंजूर लक्षांकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लकी ड्रॉ पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. कागदपत्र तपासणीसाठी येण्याचा व जाण्याचा व इतर कोणत्याही प्रकारचा खर्च अनुज्ञेय नाही, तसेच जिल्ह्याचे इतर प्रकल्प कार्यालयाच्या क्षेत्रातील अर्ज त्या त्या संबंधित प्रकल्प कार्यालयात स्वीकारले जातील, असेही पत्रकात म्हटले आहे.
*प्रवेशासाठी अटी व आवश्यक कागदपत्रे….*
• विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा.
• पालकाच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने अनुसूचित जमातीचा दाखला दिलेला असावा.
• विद्यार्थी दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्यासंबंधित यादीतील अनुक्रमांक नमूद करून दाखल्याची सत्यप्रत जोडावी.
• पालकाच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रुपये १.०० लाख इतकी राहील (सक्षम अधिका-याने दिलेला उत्पन्नांचा दाखला)
• इ. पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय 31 डिसेंबर 2024 रोजी 6 वर्षे पूर्ण असावे. त्याचा जन्म 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर 2018 या दरम्यान झालेला असावा.
• विद्यार्थ्याचे आधारकार्ड आवश्यक आहे (सत्यप्रत जोडावी)
• अर्जासोबत विद्यार्थ्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात यावे.
• विद्यार्थ्याचे २ पासपोर्ट साईज फोटो जोडावेत.
• विद्यार्थ्याचे पालक शासकीय/निमशासकीय नोकरदार नसावेत.
• विद्यार्थी अनाथ, अपंग, महिला पालक, विधवा, घटस्फोटीत निराधार परितक्त्या असल्यास सोबत दाखला जोडावा.
• निवड झालेल्या विद्यार्थ्याची शाळा बदलता येणार नाही. त्या बाबतचे पालकाचे हमी पत्र जोडणे आवश्यक आहे.
• पालकांनी कोणतीही खोटी माहिती दिल्यास व तपासणीत आढळून आल्यास विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यावी.
आदिम/ अनुसूचित जमातीच्या पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे पत्रकात करण्यात आले आह