ब्रेकिंग

शेतात आलेल्या माकडांना हूसकावून लावताना दोन्ही भावांनी गमावला जीव.

नाशिक जनमत.    देवळा खामखेडा.  खामखेडा शिवारातील बुटकेश्वर शिवारातील शेतकरी गणेश संतोष आहेर हे त्यांच्या शेतामध्ये राहत असतात .त्यांना दोन मुले असून तेजस व बारा वर्ष व मानव आठ वर्ष  हे बुधवारी शाळेतून घरी आल्यानंतर त्यांनी जेवण केले. आपल्या आई-वडिलांना मदत करण्यासाठी दुपारी शेतात उन्हाळा कांदा काढणी सुरू असल्याने आई-वडिलांना मदत करण्यासाठी शेतात

 

गेले. होते सध्या सर्वत्र पाण्याचे टंचाई असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात अनेक विहिरी शेत तलाव या ठिकाणी येत असतात. त्यांच्या शेतात देखील काही माकडे पाणी पिण्यासाठी येतात. परंतु काही शेतातील पिकांचे नुकसान देखील करतात .त्यामुळे या शेतात आलेल्या माकडांना च्या मागे धावले .हे दोघे भाऊ माकडांना उसकावून परत येताना आपल्या शेतात असलेल्या शेततळ्याजवळ गेले दरम्यान मोठ्या भाऊ तेजस याचा पाय घसरल्याने तो शेततळ्याच्या पाण्यामध्ये पडला त्याला बाहेर येत नसल्याने लहान भाऊ मानव हा त्याचा जीव वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उतरला शेततळ्यातील पाण्याला शेवाळ असल्याने दोघेही भाऊ पाण्यामध्ये खऊ लागले जवळच उभ्या असलेल्या बहिणीने पळत जाऊन शेतातील आई-वडील व नागरिकांना ही घटना सांगितली. शेततळ्यात भरपूर पाणी असल्याने आई वडील व नागरिक शेततळ्याजवळ  जवळ आले असले तरी. पाण्यात पडून भरपूर वेळ झाला होता यामुळे दोघी भावांची प्राणज्योत मावळली. शेतात जवळील शेतकरी हरेश शेवाळे यांनी दोन्ही मुलांचे मृत्युंजय शेततळ्यातून बाहेर काढले हॉस्पिटलमध्ये नेले असता मृत्यू घोषित केले देवळा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे या घटनेमुळे खामखेडा  या गावावर शोक काळा पसरलेले आहे.  अतिशय दुर्दैवाची ही घटना घडली आहे. यावर्षी अनेक भागात  मोठा दुष्काळ असून पाण्यासाठी नागरिकांना वन वन करावी लागत आहे. आपला स्वतःचा जीव अमूल्य असून कृपया सावधगिरीने विहिरीतून पाणी ओढावे तसेच टँकर आले असेल तर आपल्या बालकांची काळजी घ्या व आपली काळजी घ्या. या घटनेमुळे सर्वत्रहळहळ  व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे