देव बलवंत तर म्हणून मोहित बिबट्या पासून वाचला. मालेगाव येथील लॉन्स मधील घटना.

नासिक जनमत काल मंगळवारी सकाळी साडेसातची वेळ वडील साई सेलिब्रेशन लॉन्चच्या बुकिंग कार्यालयामध्ये कामात होते यावेळी वडिलांना बाहेर जायचे असल्याने वडिलांनी तू साही सेलिब्रेशन लॉसचया बुकिंग केबीन मध्येमध्ये जाऊन बस. असे सांगितले . आणि मोहित सेलिब्रेशन कार्यालयाच्या बुकिंग ऑफिस मध्ये जाऊन बसला मोबाईल मध्ये काहीतरी खेळत असताना एक फूट अंतरावर अचानक बिबट्या त्याच्यासमोरून कार्यालयामध्ये शिरला. यावेळी मोहित अहिरे अक्षरशः थरथर कापत होता परंतु वेळेचे भान राखत त्याने मंगल कार्यालयाच्या बाहेर जाताना मंगल कार्यालयचा दरवाजा बंद केला चेक आपल्या घरी गेला आणि वडिलांना ही हकीकत सांगितली. वडिलांनी मंगल कार्यालयात येऊन बघितले असता त्यांना बिबट्या मंगल कार्यालया दिसून आला दरम्यान वन विभागाला कळल्यानंतर चार तासाने गुंगीचे इंजेक्शन दिल्यानंतर बिबट्याला पिंजऱ्यामध्ये बंद करण्यात आले. बिबट्याने नुकतीच शिकार केल्याने तो सुस्त असल्याने व देव बलवंत नशीबचांगले असल्याने. त्याचा जीव वाचला. घटनास्थळावर नागरिकांनी गर्दी केली होती. दरम्यान नाशिक शहरासारखे आता मालेगाव शहरात बिबट्याचा वावर वाढला आहे .दिवसेंदिवस बिबट्यांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. जंगली भागामध्ये शिकार मिळत
नसल्याने बिबट्या आता शहराकडे वळू लागले आहेत. सर्वत्र मोहितचे कौतुक केल्या जात आहे. प्रसंग विधान राखून त्याने आपला जीव वाचवला व बिबट्याला देखील पिंजऱ्यामध्ये बंद करण्यास सहकार्य केल्यामुळे त्याचा धाडस च कौतुक होत आहे.