सुधाकर भालेकर चषक अशोक जैन व डॉ. पुराणिक संघ अंतिम फेरीत
सुधाकर भालेकर चषक
अशोक जैन व डॉ. पुराणिक संघ अंतिम फेरीत
स्टार ईलेवन, नाशिकरोड पुरस्कृत, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन आयोजित कै. सुधाकर भालेकर मेमोरियल चषक टिट्वेंटी स्पर्धेच्या
उपांत्य फेरीत अशोक जैन ईलेवन व डॉ. पुराणिक ईलेवन यांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला .
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान , गोल्फ क्लब वर झालेल्या उपांत्य फेरी सामन्यांचे संक्षिप्त धावफलक व निकाल :
१ अशोक जैन ईलेवन विरुद्ध व्ही पि बागुल ईलेवन – अशोक जैन ईलेवन – ५ बाद १२४ – तेजस पवार नाबाद ४२ व आशुतोष शिंदे २४ धावा , तन्मय २ बळी वि व्ही पि बागुल ईलेवन – सर्वबाद ५९ – विशाल मोहिते व आदित्य पांडे प्रत्येकी ३ व निशांत पगारे २ बळी.
अशोक जैन ईलेवन ६५ धावांनी विजयी .
२ बाबा शेलुकर ईलेवन विरुद्ध डॉ. पुराणिक ईलेवन – बाबा शेलुकर ईलेवन – ४ बाद १७५ – मेघ वडजे नाबाद ४९ व
पुष्कर अहिरराव २७ धावा. अलिम पठाण ५ बळी .
वि डॉ. पुराणिक ईलेवन – ९ बाद १५४ . प्रणव पवार नाबाद ४६ व अलिम पठाण नाबाद ३७ धावा . सिद्धार्थ नक्का २ व रिथविक जावळे १ बळी
डॉ. पुराणिक ईलेवन ६ गडी राखून विजयी .
मंगळवार २ जानेवारी रोजी अशोक जैन ईलेवन व डॉ. पुराणिक ईलेवन या संघांमध्ये अंतिम सामना रंगेल.
खुल्या गटातील नाशिकच्या निवडलेल्या १६ संघांमध्ये , नाशिकचे प्रतिनिधित्व केलेल्या माजी खेळाडू, प्रशिक्षक व पदाधिकारी दिवंगत डॉ. पुराणिक, व्ही पि बागुल , प्रभाकर दाते , चंदा शिंदे , बाबा शेट्टी, शेखर गवळी, अविनाश आघारकर,अख्तर शेख , विजय भोर, जयंतीलाल अशा नावांच्या संघात , चार गटातील विजेत्यात हि उपांत्य फेरी झाली.
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन.
प्रणव पवार साखळीत नाबाद ११४ व उपांत्य फेरीत नाबाद ४६ आणि अलिम पठाण ५ बळी व नाबाद ३७ धावा यांची छायाचित्रे सोबत पाठवीत आहे.