सबर्बन एज्युकॉन 2023 मोठ्या उत्सहात संपन्न*
*सबर्बन एज्युकॉन 2023 मोठ्या उत्सहात संपन्न*
नाशिक जनमत. मुंबई प्रतिनिधी महाराष्ट्र लाबो्रेटरी टेकनिशियन प्रॅक्टिशनर असोसिएशन (MLTPA) वार्षिक सबर्बन एज्युकॉन 2023 CME dr आंबेडकर सभागृह,महाड रायगड येथे उत्साहात पार पडली.पद्मश्री मा. dr हिम्मतराव बावसकर आणि संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्री राजेंद्र बागुल,नाशिक यांच्या हस्ते परिषदेचे उदघाट्न करण्यात आले .dr प्रफुल गोडकर यांच्या मेडिकल क्षेत्रातील तीन पुस्तकांचं प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं लंबो्रेटरी क्षेत्रातील वरिष्ठ मान्यवर यांचा लॅबोरेटरी क्षेत्रातील योगदानबद्दल मा. श्री जयंत बर्वे नाशिक, जितेंद्र काकू मुंबई, सुरेश सावंत माणगाव रायगड, आणि श्री पद्माकर पिंपुटकर महाड रायगड यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित कारण्यात आले.dr हिंमत बावसकर यांनी daibitis आणि laboratory care आणि निदान या विषयावर मार्गदर्शन केलं.bone marrow blood group and ट्रान्सप्लांट या विषयावर नाशिकचे तज्ञ् dr निलेश वासेकर यांनी मार्गदर्शन केले. कल्याण birla कॉलेज चे प्रोफेसर श्री किशोर देसाई यांनी लॅबोरेटरी अर्थकारण आणि व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केलं. संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्री राजेंद्र बागुल यांनी, संघटना राज्यातील सर्व सभासदांच्या पाठीशी तन मन धन लावून भक्कम उभी असून प्रत्येक सभासदाचा 5 लाखाचा अपघाती विमा काढून, प्रतिनिधीक स्वरूपात विम्याचे प्रमाणपत्र सभासदांना देण्यात आले. प्रदेश सचिव श्री केतन औसरकर नाशिक यांनी तंत्रज्ञ बांधवाना येत्या काळात सामोरे जावे लागणारी आव्हाने आणि भविष्यातील व्युहरचना यावर मार्गर्शन केलं.संघटनेचे कोषाध्यक्ष मधुकर सानप यांनी जीवन गौरव पुरस्कार माण्यावरांचा थाडक्यात परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे उपाध्यक्ष जगदीश पाटील यांनी उत्तम रित्या,नीटनेटके करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.परिषदेचे आयोजक कोर कमिटी सदस्य श्री संजय शेठ माणगाव रायगड परिषद यशस्वी करण्यासाठी खुप मेहनत घेऊन,पाहुण्यांचे कोकणवासियांनी जोरदार स्वागत केले. व्यसपीठावर संघटनेचे कोर कमिटी सदस्य मारोती धर्माधिकारी हिंगोली, योगेश देशमुख सोलापूर, प्रशांत घोटेकर नाशिक, अतुल उरसाल चिखली, बळवंत चिंचोळकर उदगीर, अमोल धात्रक, दिलीप घुले, विनेश नायर कल्याण,गणेश खरात बारामती, राहुल भंडारे संभाजीनगर, अनिल बिरादार उदगीर, संतोष मचाले सोलापूर,नितीन वाडीकर अकोला उपस्थित होते. संपूर्ण राज्यातून प्रयोग शाळा तंत्रज्ञ बांधवानी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.