दक्षिण भारतात ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे हाहाकार, आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, चेन्नईला पावसाने झोडपलं
मिचाग चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरातील मिचाँग वादळ मंगळवारी सकाळी आंध्रच्या नेल्लोर, मछलीपट्टणम किनारपट्टीवर धडकेल. याआधी चेन्नईसह आंध्र किनारी भागात १८ तास पाऊस झाला. रस्ते नद्या बनले. वाहने वाहून गेली. चेन्नई विमानतळावर पाणी साचले होते. ७० हून अधिक उड्डाणे रद्द झाली. २०४ रेल्वे रद्द केल्या गेल्या. मंगळवारपर्यंत विमानतळ बंद असेल. पुरात ५ जणांचा मृत्यू झाला. वाऱ्याचा वेग ताशी ११० किमीपर्यंत असेल. आंध्र, तामिळनाडू, पुडुचेरी व तेलंगणला रेड अलर्ट दिला गेला.
दक्षिण भारताकडे पुण्याहून जाणाऱ्या १२ विमानांचे उड्डाण रद्द
पुणे | खराब हवामानामुळे पुण्याहून चेन्नई, हैदराबाद, विशापट्टणम येथे जाणारी व चेन्नई, विशाखापट्टणम, हैदराबाद, नागपूर येथून पुण्याकडे येणारी १२ उड्डाणे सोमवारी रद्द करण्यात आली होती. यात सर्वाधिक चेन्नईची तीन विमान होती
[5/12, 7:16 AM] NASHIK JANMAT: दक्षिण भारतात ‘मिचॉन्ग’ चक्रीवादळामुळे हाहाकार, आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू, चेन्नईला पावसाने झोडपलं