जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 4 डिसेंबर रोजी आयोजन* *:निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ
*जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 4 डिसेंबर रोजी आयोजन*
*:निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ*
*नाशिक, दिनांक 8 नोव्हेंबर, 2023 वृत्तसेवा):*
जिल्ह्यस्तवर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे दुपारी 2.00 वाजता आयोजन केले जाते. परंतु सुधारित वेळेनुसार जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, 4 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 3.00 वाजता होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन सोमवार, 4 डिसेंबर रोजी दुपारी 3.00 वाजता मध्यवर्ती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे केले आहे. या लोकशाही दिनातील अर्ज विहित नमुन्यात असावे. त्यातील तक्रार अथवा निवेदन हे वैयक्तिक स्वरूपाची असणे आवश्यक आहे. तसेच चारही स्तरावरील लोकशाही दिनाकरिता अर्जदाराने दोन प्रतीत 15 दिवस आधी अर्ज पाठविण्यात यावा. त्याचप्रमाणे तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्यानी जिल्हा लोकशाही दिनात अर्ज सादर करावा.
न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व /अपिल्स, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत, असेही निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी कळविले आहे.