महिरावणी मातोश्री पाटील विद्यालयात विठ्ठलनामाची शाळा भरली… चिमुकल्यांचा विठुनामाचा जयघोष करीत उत्स्फूर्त सहभाग

महिरावणी मातोश्री पाटील विद्यालयात विठ्ठलनामाची शाळा भरली…
चिमुकल्यांचा विठुनामाचा जयघोष करीत उत्स्फूर्त सहभाग
नाशिक: प्रतिनिधी
महिरावणी येथील मातोश्री गि.दे. पाटील माध्यमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त ज्ञानोबा माउलींच्या गजरात दिंडी काढण्यात आली. महिरावणीचे जेष्ठ नागरिक मनोहर खांडबहाले व सौ सुमन मनोहर खांडबहाले या दाम्पत्यांने तसेच मुख्याध्यापक अशोक भदाणे व सर्व शिक्षकांनी पालखीचे पूजन करून दिंडीची सुरुवात केली.
यावेळी शाळेपासून ते महिरावणी गावातून दिंडीत विठ्ठल-रखूमाई, वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी हाती टाळ घेत चंद्रभागेच्या तिरी, पाऊले चालती, विठ्ठलनामाची शाळा भरली… यांसारखी गीते व भजने विद्यार्थ्यांनी सादर केली.बालगोपालांच्या दिंडीने जणू काही विठू नामाची शाळा असेच भक्तिमय वातावरण तयार झाले होते. यावेळी विद्यालयाचे उपशिक्षक बाळासाहेब सोनवणे यांनी आषाढी एकादशीची माहिती सांगत दिंडीचे महत्त्व विशद केले. झाडे लावा, झाडे जगवा, वृक्ष लावा, मोक्ष मिळवा…अशा विविध घोषणा देत वृक्षदिंडीतून चिमुकल्यांनी नागरिकांना झाडांचे महत्त्व पटवून दिले.यावेळी वृक्षदिंडी, अश्व रिंगण असे उपक्रम राबविले. मुली डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या. यावेळी विठ्ठल-रखूमाई,संत तुकाराम,वारकरी अशा वेशभूषेतील क्रितिका खांडबहाले, किर्ती भालेराव,आश्वनी खांडबहाले, हरि कापसे, प्रसाद खांडबहाले, मोहन कापसे,सुमेध दाते,तेजस दाते,ओम खांडबहाले,ओमकार व्यवहारे,कृष्णा दाते,तुषार खेटरे इ.अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी दिंडीत सहभागी झाले होते.नऊवारी साडेतीन विद्यार्थिनींनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. हातातील टाळ-चिपळ्यांचा गजर,मुखी विठ्ठलनाम यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले व भाविकांची मने जिंकली.यावेळी अश्व रिंगण हे दिंडीचे आकर्षण ठरले.
यावेळी संजय पवार,देवेंद्र देवरे,संजय गायकवाड, सुरेखा भामरे,अश्विनी चौरे,दिपाली वाडीले,खंडू लांबे,अरुण शिरसाट, दिलीप खांडबहाले,विलास येवले यांनी कार्यक्रम यशस्वीसाठी परिश्रम घेतले.यावेळी दिंडीत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.ग्रामस्थांनी बालगोपालांच्या दिंडीचे स्वागत केले.